lanke on padalkar news : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर या रणांगणात; सांगलीतून निलेश लंकेंचं आव्हान, रोहित पवारही बसरले : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेवरून निर्माण झालेल्या वादळाचे पडसाद आज सांगलीत तीव्रतेने उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित ‘संस्कृती बचाव मोर्चा’ च्या सभेत खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
lanke on padalkar news : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर या रणांगणात; सांगलीतून निलेश लंकेंचं आव्हान, रोहित पवारही बसरले
दम आहे तर या रणांगणात : निलेश लंके
खासदार निलेश लंके म्हणाले की, याचा आका एसीत बसतो, आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर एकदा रणांगणात या. सरकारमधील लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून असल्या गोष्टी पुढे केल्या जातात. वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते, आता चार पोलीस घेऊन फिरत आहेत. दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने आहे. हा विषय तालुका, जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो, पण आम्ही शब्दांची पातळी जपतो. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिराती दिल्या, निनावी जाहिराती दिल्या. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात फडणवीस यांनी आणले आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला.
यांचा बोलवता धनी कोण? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला, आपण महामानवांची जयंती साजरी करतो पण त्यांच्या विचारांचे अनुकरण करत नाही. बहुजन समाजाच्या नेत्याचा वापर पवार कुटूंबावर, मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी केला जातोय. पवार कुटुंबाला बोलतात, पाटील कुटुंबाला बोलतात, बहुजन समाजाच्या नेत्यांना कळत नाही की यांचा उपयोग करून घेतला जात आहे.
lanke-on-padalkar-news-leave-the-police-aside-for-once-if-you-have-the-strength-then-go-to-this-battlefield-nilesh-lankas-challenge-from-sangli-rohit-pawar-also-agreed
या लोकांना बोलून उपयोग नाही, यांचा बोलवता धनी कोण? त्यांना बोलले पाहिजे. आमच्यावर ईडीची नाहीतर दुसरी कोणतीही कारवाई करा, आम्ही घाबरणार नाही. निवडणूक आली की हे लोक समाजासमाजात तेढ निर्माण करतात. लोकसभेत हिंदू-मुस्लिम केले, विधानसभेत मराठा ओबीसी केले. आता मुंबईत मराठी-अमराठी करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










