sangli market commiti news : बाजार समिती पदाधिकार्‍यांना दिवाळी गिफट

SHARE:

sangli market commiti news : बाजार समिती पदाधिकार्‍यांना दिवाळी गिफट : राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या गतवर्षी वाढाव्यामध्ये आहेत, अशा बाजार समित्यांचे सभापती, उपसभापतींच्या दरमहाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पणन संचालक विकास रसाळ यांनी घेतला आहे. आता सांगली बाजार समितीच्या सभापतींनी 10 हजारावरुन 12 हजार, उपसभापतींना 5 हजारावरुन 10 हजार मिळणार आहेत. याशिवाय दैनिक भत्ता आणि बैठक भत्ता दरही वाढविण्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान गतवर्षी तोट्यात असणार्‍या बाजार समित्यांना या वाढीमधून वगळण्यात आले आहे.

sangli market commiti news : बाजार समिती पदाधिकार्‍यांना दिवाळी गिफट

सभापती, उपसभापतींच्या मानधनात वाढ, बैठक भत्ताही वाढल्याने संचालकांना दिलासा

पणन संचालनालयाने यापूर्वी 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या मानधनात वाढ केली होती. त्याचा विचार करून नवीन परिपत्रक पणन संचालक रसाळ यांनी जारी केले आहे. अ वर्ग बाजार समित्यांसाठी पूर्वी एक कोटी रुपये वार्षिक उत्पन्न निश्चित होते. आता उत्पन्नाचे मानधन देण्यासाठी अ वर्गात पाच टप्पे केले आहेत. अ’ वर्गासह नवीन टप्प्यातील बाजार समित्यांतील सभापती, उपसभापतींच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. सांगली बाजार समितीच्या सभापतींना यापूर्वी 10 हजार मानधन होते, ते आता 12 हजार उपसभापतींना 5 हजारावरुन 10 रुपये मानधन मिळेल.

आता बाजार समिती सदस्यांना दैनिक भत्ता ग्र्ाामपंचायत क्षेत्रात 700 रुपये (400 वाढ), नगरपालिका क्षेत्र एक हजार रुपये (550 वाढ), महानगरपालिका क्षेत्र 1500 (900 वाढ), राज्याबाहेरील क्षेत्र 2 हजार रुपये (1250 वाढ) भत्ता करण्यात आला आहे. याशिवाय सभा बैठक भत्ता दर हे उत्पन्न मर्यादेनुसार शंभर लाखांच्यावर आता 2 हजार रुपये, 50 लाख ते 100 लाखापर्यंत 1500 रुपये, 25 लाख ते 50 लाखापर्यंत 1 हजार रुपये आणि 25 लाखांपेक्षा कमी उत्पन्न मर्यादेत 700 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

राज्यातील कृषी उत्पन्न पदाधिकारी, संचालकांचे मानधन, भत्ता वाढ करण्यासाठी बाजार समिती संघाने पणन संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यास यश आले असून, बाजार समित्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात 306 बाजार समित्या असून, गतवर्षी सुमारे 191 बाजार समित्या या वाढाव्यामध्ये राहिलेल्या आहेत. ’ड’ वर्गात 36 बाजार समित्यांचा समावेश आहे.

sangli-market-commiti-news-diwali-gift-to-market-committee-office-bearers

पणन नवीन योजनांसाठी निधी द्यावा ः सुजय शिंदे

पणन संचालकांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी असून त्याच स्वागत करतो, पणन विभागाकडून बाजार समितीसाठी नववीन योजना सुरु करुन भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न करावा, त्यामुळे बाजार समित्यांच्या विकासास मदत होईल, असे मत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *