kasbe digraj crime news : कसबेडिग्रज मध्ये किरकोळ कारणातून तिघांना बेदम मारहाण : सात जणांवर गुन्हा दाखल. : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये किरकोळ कारणातून तरुणासह त्याच्या आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी धनंजय मारुती खरात (वय 21 रा. कसबेडिग्रज) याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
kasbe digraj crime news : कसबेडिग्रज मध्ये किरकोळ कारणातून तिघांना बेदम मारहाण : सात जणांवर गुन्हा दाखल.
त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्या प्रमोद कांबळे, रुद्रप्रताप कारंडे, प्रदीप उर्फ पिंटू कांबळे, जीज्ञा कांबळे आणि प्रज्ञा कांबळे (सर्व रा. कसबेडिग्रज) व इतर दोन अनोळखी अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी धनंजय खरात हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये राहतो. रविवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. यावेळी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास संशयित सात जण त्यांच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले. यावेळी घरातील सर्वजण बाहेर आले असता संशयित जिज्ञा कांबळे आणि प्रज्ञा कांबळे या दोघीनी धनंजयसह त्याच्या आई वडिलांना शिवीगाळ केली. प्रदीप कांबळे याने धनंजय याच्या वडिलांच्या छातीवर लाथ मारून इतर सर्वजण घरात घुसले.
तुझ्या मुलीला आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी फितवत असून तो आमच्या प्रकरणात कशाला लक्ष घालतो असे म्हणून आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करत हातात कोयत्या घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आले. घडलेल्या या प्रकारानंतर धनंजय खरात याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











