jayant patil news : महिलांची कॅन्सर तपासणीसाठी फिरते पथक उपलब्ध करण्याचा प्रयत्न ः आ.जयंत पाटील : महिला आपल्या कुटुंबाला वेळ देण्यात इतक्या व्यस्त असतात की त्यांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. आता महिलांनी शासकीय आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घेत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यातील गावोगावच्या महिलांची कॅन्सर तपासणी करण्यासाठी फिरते पथक उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.
jayant patil news : महिलांची कॅन्सर तपासणीसाठी फिरते पथक उपलब्ध करण्याचा प्रयत्न ः आ.जयंत पाटील
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ’स्वस्थ नारी, सशक्त परिवार’या अभियानातील महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण पाटील, सुरेश हवलदार उपस्थित होते. आ.पाटील म्हणाले, आरोग्य तपासणी पंधरवड्यात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असून त्यातून संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहू शकते. या शिबारात कॅन्सर तपासणीसह 24 हजार आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
महिलांनी याचा लाभ घ्यावा. सध्या आरोग्य सुविधा मोठया खर्चिक झाल्या आहेत. त्यामुळे सर्व घटकांनी प्रथम शासकीय आरोग्य सुविधा व योजनांचा लाभ घेण्यास प्राधान्य द्यावे. डॉ.विक्रमसिंह कदम म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अभियान सुरू केले आहे. महिलांच्या मोफत तपासण्या आणि उपचार केले जाणार आहेत. आम्ही ग्रामीण भागातील रुग्णांना शहराप्रमाणे अद्यावत आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
डॉ.विजयकुमार वाघ म्हणाले, या अभियानातून एकही भगिनी वंचित राहू नये असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही अद्यावत ह्रदय तपासणी यंत्राद्वारे 112 रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. याप्रसंगी डॉ.प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, परेश पाटील, डॉ.प्रज्ञा पाटील, डॉ.रामतीर्थ चौगुले, डॉ.अविनाश पाटील, डॉ.नितीन शहा, डॉ. विनायक कोरे, डॉ.अभिजित खोत, डॉ.शहाजी शेळके यांच्यासह आशा वर्कर्स, नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी -विद्यार्थिनी व महिला उपस्थित होत्या. डॉ.नरसिंह देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदेश सुतार यांनी आभार मानले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











