bhilwadi accident news : भिलवडी स्टेशनजवळ दुधाचा टँकर उलटून दोघांचा मृत्यू : पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने प्रशांत दिलीप देवकुळे वय 23 व तेजस सुशील भोरे वय 19 दोघे राहणार नेहरूनगर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.
bhilwadi accident news : भिलवडी स्टेशनजवळ दुधाचा टँकर उलटून दोघांचा मृत्यू
भिलवडी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक एम एच 10 एन 9000 या दूध वाहतूक करणार्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे वय वर्ष 23 राहणार नेहरूनगर निमणी हा दोन वर्षापासून चालक म्हणून काम करीत होता.
सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रशांत व त्याच्या आत्त्याचा मुलगा तेजस सुशील भोरे वय वर्षे 19 राहणार नेहरूनगर निमणी याच्यासह सरूड वडगाव ता.शिराळा येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन, भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरीकडे येत असताना मंगळवार 23 रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणार्या चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्याजवळ चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने, टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. यामध्ये प्रशांत देवकुळे व तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले.
या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्याचबरोबर हा टँकर येथील लोक वस्तीतील दोन कुटुंबाच्या शौचालय व बाथरूमवर पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने लोक वस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून,नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी मयत झाल्याचे सांगितले.
bhilwadi-accident-news-two-killed-as-milk-tanker-overturns-near-bhilwadi-station
यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे याचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











