kundal siside news : कुंडलमध्ये सावकारांच्या भितीने एकाची आत्महत्या : कुंडल व परिसरामध्ये खासगी सावकारकीचा पाश आवळत चालला असून, सावकारांच्या त्रासाला कंटाळून घोगाव मधील महेश मोहन चव्हाण या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मयत महेश चव्हाण यांने आत्महत्येपुर्वी कुटुंबीयांना व जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र पाठविल्याने सावकारकीचा हा प्रकार उघडकीस आला.
kundal siside news : कुंडलमध्ये सावकारांच्या भितीने एकाची आत्महत्या
सावकार सचिन आवटेसह पाच जणांवर गुन्हा
आरोपी सचिन संपत आवटे यांच्यासह दिलीप मारुती आवटे, तुषार शंकर चव्हाण, बब्बर लाड, अक्षय गरदंडे, प्रदिप संपत देशमुख, सर्व रा. कुंडल यांच्या विरोधात कुंडल पोलिसात मयत महेश चव्हाण याला व्याजाच्या पैशाचा तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची हकीकत अशी, मयत महेश चव्हाण यांने वरील सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते त्याच्या व्याजापोटी एक वर्षापासून त्याच्याकडून व्याजाची वसुली सुरु होती पैकी सचिन संपत आवटे याने आतापर्यंत दिलेल्या रकमेच्या व्याजापोटी तीन लाख रु वसूल केले असून आणखी पंच्यान्नव हजार रुपयांची मागणीसाठी तगादा लावला होता
kundal-siside-news-one-commits-suicide-in-kundal-due-to-fear-of-moneylenders
तर दिलीप मारुती आवटे हा दोन लाख चाळीस हजार रु.तुषार शंकर चव्हाण छप्पन हजार रुपये, बब्बर लाड दोन लाख नव्वद हजार रु. तर प्रदिप संपत देशमुख पस्तीस हजार रुपये असे एकूण अंदाजे सात ते आठ लाख रकमेची व्याजापोटी मागणी करत त्रास देत होते. या सर्व पैशाच्या वसुलीचे काम अक्षय गरदंडे मार्फत केली जात होती. त्यानेही मयत महेश यास वारंवार फोन करुन पैशासाठी धमकी देत होता. या सर्वांच्या सावकारीच्या व्याजाच्या पैशावरुन होणार्या त्रासाला कंटाळून त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











