hasan mushrif on mahadik news : ’एकाने 80 आणि दुसर्याने 81 जागा वाटून घेतल्या : आम्ही लंडनवारीमध्ये असताना राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे विद्यमान आमदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत, एकाने 80 जागा वाटून घेतल्या आणि दुसर्याने 81 जागा वाटून घेतल्या, असा खोचक टोला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांना लगावला.
hasan mushrif on mahadik news : ’एकाने 80 आणि दुसर्याने 81 जागा वाटून घेतल्या
आम्हाला गृहित धरत नाहीत : हसन मुश्रीफांचा खोचक टोला
ते पुढे म्हणाले, हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या सत्तेत कुठंही दिसत नव्हते. गेली 25 वर्ष आम्ही सत्तेत होतो हे त्यांना लक्षात घ्यावच लागेल, आम्हाला जम्यात धरत नाही म्हणून हे बोलावं लागतं, असे मुश्रीफ म्हणाले. मनपा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लगभग सुरु झाली असून त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत चालले आहेत.
कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती
कोल्हापूर मनपाच्या महायुतीच्या जागावाटपावरून हसन मुश्रीफ यांनी खोचक शब्दात भाष्य केले. ते म्हणाले की, आम्हाला कुठेही जमेत धरलं नाही. त्यामुळे मी म्हणालो कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं तरी महानगरपालिका आम्हाला ताकतीने लढावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे मी काही भाकीत करणार नाही त्या ठिकाणी कदाचित बंडखोरी होईल,
पण आमचं ठरलं आहे ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढायचं, असे मुश्रीफ यांनी सांगितले. महापालिकावर युतीचा झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे. ज्यांचे नगरसेवक होते त्या जागांचे पहिल्यांदा वाटप होईल आणि त्यानंतर उरलेल्या जागांवर चर्चा करून वाटप होईल, असे ते म्हणाले.
hasan-mushrif-on-mahadik-news-one-shared-80-and-the-other-81-seats
त्यामुळे भाजपला राग येणारच
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही संबंध नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना अनेकवेळा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचा असल्याचे ते म्हणाले. मोर्चा पडळकर यांच्या विरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर टीका झाली. त्यामुळे सहाजिकच भारतीय जनता पक्षाला राग येणार, असे त्यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










