rajarambapu karkhana news : राजारामबापू साखर कारखान्यास बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार

SHARE:

rajarambapu karkhana news : राजारामबापू साखर कारखान्यास बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या साखर कारखानदारीत तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या दि डेक्कन शुगर टेक्निलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) संस्थेच्या वतीने राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्यास बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्काराने तर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत लक्ष्मण पाटील यांना आउट स्टँडिंग परफॉर्मन्स इन शुगर इंडस्ट्री या पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

rajarambapu karkhana news : राजारामबापू साखर कारखान्यास बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार

मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांना आउट स्टँडिंग परफॉर्मन्स पुरस्कार

राज्याचे सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी हे पुरस्कार स्विकारले.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे कुशल मार्गदर्शन, राजारामबापू साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक व अधिकारी-कामगारांच्या योगदानातून आम्ही जी वाटचाल करीत आहोत, त्याचे फलित म्हणजे हे पुरस्कार आहेत. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असल्याची भावना कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी डेक्कन शुगर टेक्निलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) या संस्थेचे अध्यक्ष एस.बी.भड, उपाध्यक्ष सोहेल शिरगावकर, उपाध्यक्ष एम.के.पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तांत्रिक) एस.डी.बोकारे, कारखान्याचे सचिव डी.एम. पाटील,जनरल मॅनेंजर (वर्क्स) विजय मोरे, जनरल मॅनेंजर सुनिल सावंत, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, चिफ केमिस्ट (वाटेगाव-सुरूल) संभाजी सावंत, इन्व्हायरमेंट ऑफिसर आर.एस. पाटील, तेजस्विनी प्रशांत पाटील, कु.आयुस प्रशांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *