kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण करत कोयत्याने केले वार

SHARE:

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण करत कोयत्याने केले वार : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये लघुशंका करतानाच व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून दोघा तरुणांना बेदम मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटना हि बुधवार दि. 01 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे घडली.

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण करत कोयत्याने केले वार

या प्रकरणी जखमी मेहबूब मोलसाब बाबानगर (वय 43 रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या विनायक आप्पासो जाधव (वय 42) आणि आदित्य विनायक जाधव (वय 18 दोघे रा. कसबेडिग्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी मेहबुब बाबानगर हे मजुरी करतात. त्यांची दोन मुले आयान आणि आर्यन ही घरानजीक लावलेल्या त्यांच्या चारचाकीत मोबाईलवर गेम खेळत बसली होती. त्यावेळी तेथे संशयित विनायक आप्पासो जाधव (वय 42) आला. त्याने तु माझे मोबाईलमध्ये छायाचित्रण का केलेस ? असा जाब त्यांना विचारला. तसेच आर्यन याच्या कानाखाली मारली तर आयान याच्या पोटावरती लाथ मारली. त्यानंतर चारचाकीतील कोयता घेवून मुलांना कोयत्याच्या मुठीने मारले.

kasbe-digraj-crime-news-koyata-brutally-beat-up-two-people-on-suspicion-of-filming-a-video-in-kasbe-digraj

तसेच, तुला मस्ती आली आहे, तुला जीवंतच ठेवत नाही असे म्हणून मारहाण केली. यानंतर रात्री 10. 45 च्या सुमारास विनायक जाधव आणि त्याचा मुलगा आदित्य (18) असे दोघे फिर्यादी मेहबुब यांच्या घरासमोर येवून त्यांनी मेहबुब यांच्या कानाखाली मारली तसेच शिवीगाळ करुन तिथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *