samdoli news : समडोळीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या क्रांती पाटील

SHARE:

samdoli news : समडोळीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या क्रांती पाटील : समडोळी ता. मिरज येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. क्रांती राजेंद्र पाटील यांची निवड झाली. अमजद फकीर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

samdoli news : समडोळीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या क्रांती पाटील

सरपंच सौ. सुनिता हजारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामपंचायत अधिकारी जेउर साहेब यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रीया पार पडली. .सत्ताधारी राष्ट्रवादीकडून क्रांती पाटील तर विरोधी शेतकरी संघटनेकडून प्रविण पाटील यांचा अर्ज आला होता. दोन्ही उमेदवारांना समान 9 मते पडल्याने सरपंच सौ. सुनिता हजारे यांच्या मताने क्रांती पाटील निवडून आल्या. निवडीनंतर क्रांती पाटील यांचा सत्कार पॅनेलप्रमुख सुरेश पाटील, वैभव पाटील, महावीर चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी किरण पाटील, अभय पाटील, महाबल मुंडे, माजी उपसरपंच प्रमोद ढोले, अमजद फकीर, कृष्णात मसाले, सदस्य लिलावती अडसूळ, सौ. सौंदडे, अबुभाई खलिफा, सौ. सुजाता पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते.

अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 10 सदस्य आणि सरपंच निवडून आले होते. पहिल्या वर्षी कृष्णात मसाले यांनी संधी मिळाली, दुसर्‍या वर्षी अमजद फकीर यांना संधी मिळाली त्यानंतर क्रांती पाटील यांना यावर्षी संधी मिळाली. सत्ताधारी राष्ट्रवादी गटातील दोन सदस्य फुटल्याने ही निवडणूक चुरशीची झाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *