zp news : म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांजणी, उमदी, सावळज, बेडग, दिघंची गट अनुसूचित जातीसाठी निश्चित?

SHARE:

zp news : म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांजणी, उमदी, सावळज, बेडग, दिघंची गट अनुसूचित जातीसाठी निश्चित? : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पुढे सरकत आहे. जिल्हा परिषदेच्या गटांपैकी सात गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गट निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल सोमवारी (दि. 6) विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. दरम्यान म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांजणी, उमदी, सावळज, बेडग, दिघंची या गटांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

zp news : म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांजणी, उमदी, सावळज, बेडग, दिघंची गट अनुसूचित जातीसाठी निश्चित?

प्रस्ताव उद्या विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी जाणार

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 8 ऑक्टोंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध होईल. गटांच्या आरक्षण सोडत 13 ऑक्टोंबरला काढण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी व पंचायत समित्यांच्या गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे 61 गट आणि पंचायत समितीसाठी 122 गणांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या गटांपैकी सात गट हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल तयार करून सोमवारी (दि. 6) विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार (दि. 8) रोजी विभागीय आयुक्तांकडून अंतिम मान्यता मिळणार असून, त्याद्वारे सात गट अनुसूचित जातीसाठी अधिकृतपणे आरक्षित होतील.

सात गट आरक्षित झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची समीकरणे बदलणार आहेत. विशेषत: सामान्य प्रवर्गातील दावेदारांना आपले राजकीय गणित नव्याने आखावे लागणार आहे. दुसरीकडे, अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून, इच्छुकांनी आरक्षित मतदारसंघाकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका, जनसंपर्क तसेच प्रचाराच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.

सात गट अनुसूचित जातीसाठी राखीव?

जिल्ह्यातील सात जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहतील. नवीन नियमावलीनुसार आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित करत असताना जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती, जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गटापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कवलापूर (ता. मिरज), म्हैसाळ (ता. मिरज), मालगाव (ता. मिरज), रांजणी (ता. कवठेमहांकाळ), उमदी (ता. जत), सावळज (ता. तासगाव), बेडग (ता. मिरज), दिघंची (ता. आटपाड़ी) हे गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *