jayant patil news : आ. जयंत पाटील यांचे मिरज पश्चिम भागात आढावा बैठक : आपण जे सांगाल,ते-ते गावाच्या विकासा ला चालना देणारे विकास काम आपण केलेले आहे. सध्या आपले राज्यात,केंद्रात सरकार नाही. तरीही आपण जे-जे प्रश्न मांडले आहेत, त्याचा निश्चित पाठपुरावा करून ते टप्प्या- टप्प्याने पूर्ण करू,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी संपर्क दौर्यात बोलताना केला.
jayant patil news : आ. जयंत पाटील यांचे मिरज पश्चिम भागात आढावा बैठक
आ.पाटील यांनी पडवळवाडी,मर्दवाडी, माळवाडी,सावळवाडी,समडोळी आदी गावांचा संपर्क दौरा करून लोकांचे प्रश्न समजून घेतले. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील,माजी जि.प. सदस्य संभाजी कचरे,माजी सभापती वैभव पाटील,सुरेश पाटील,महावीर चव्हाण यांच्या सह मान्यवर दौर्यात सहभागी झाले होते.
आ.पाटील म्हणाले,आपणा सर्वांचे आशिर्वाद व भक्कम पाठबळाने मला सलग 40 वर्षे आपले प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले. या कालावधीत ज्या-ज्या वेळी मला राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली,त्या-त्या वेळी जे-जे चांगले आहे, गावांच्या विकासाला ज्याची गरज आहे,ती-ती विकास कामे आपण केली आहेत. भविष्यात ही आपल्या तालुक्याच्या विकासाचा प्रवाह कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. या दौर्यात विजयराव पाटील,संजय पाटील, संग्राम जाधव यांचीही भाषणे झाली.
पडवळवाडीचे के.पी.चव्हाण,सुधीर नांगरे,अर्जुन कुंभार,चंद्रकांत जाधव,राजेंद्र चव्हाण,विनायक फारणे,राहुल खोत,मर्द वाडी चे दिनकर पाटील,संभाजी पाटील, सुवर्णा नाईक,भरत देशमुख,नारायण पाटील, समडोळीचे सुरगोंडा पाटील,सरपंच सुनीता हजारे,दिनेश ऐतवडे,किरण पाटील,प्रमोद ढोले, अमजद फकीर,कृष्णात मसाले,अभय ढंग,महाबल मुंडे, क्रांती पाटील,माळवाडीचे शांतीनाथ आडमुठे,भरत मसुटगे,प्रशांत जाधव,आशुतोष कांबळे,विद्या कोळी,सावळवाडीचे नितीन दणाणे,राहुल माणगावे, आप्पासो लांडे,पूजा माणगावे यांच्यासह त्या-त्या गांवचे आजी-माजी सरपंच-उप सरपंच,गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
jayant-patil-news-a-jayant-patils-review-meeting-in-miraj-west-area
जनता दरबार आणि कौतुक॥
आ.पाटील हे मराठवाडा पूरग्रस्त दौर्या वरून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील गावांचा संपर्क दौरा सुरू केला आहे. दररोज 4-5 गावांचा दौरा करून ते लोकांशी संवाद साधत आहेत,लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यामुळे या बैठकांना जनता दरबाराचे स्वरूप आले आहे. सांगली जिल्ह्यात बेताल वक्तव्यावरून मोठा वाद सुरू असताना आ.पाटील हे कामात व्यस्त आहेत. त्याचे गावोगावी कौतुक केले जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











