islampur news : शेतकर्‍याच्या वारसांना मिळवून दिली एक कोटी 15 लाखाची भरपाई

SHARE:

islampur news : शेतकर्‍याच्या वारसांना मिळवून दिली एक कोटी 15 लाखाची भरपाई : भरधाव वेगाने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या मयताच्या नातेवाईकांना एक कोटी पंधरा लांखाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.

islampur news : शेतकर्‍याच्या वारसांना मिळवून दिली एक कोटी 15 लाखाची भरपाई

याबाबत अधिकची माहिती अशी, येड्मच्छिंद्र ता. वाळवा येथील आबासाहेब बाजीराव पाटील हे आपल्या शेतातून दुपारी घराकडे जात असताना मोटरसायकल चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून आबासाहेब यांना पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात केला होता. यामध्ये आबासाहेब यांचा मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी वासंती आबासाहेब पाटील यांनी कुटूंबीयासमवेत वारस म्हणून इस्लामपूर कोर्टमध्ये मोटरसायकल चालक, मालक व इन्शुरन्स कंपनी विरुद्ध नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केले होता.

सर्व पुरावे नुसार मोटर वाहन अपघात न्यायाधिकरण, इस्लामपूर येथील अनिरुद्ध थत्ते यांच्या न्यायालयाने अपघात तारखेपासूनचे व्याजासह एक कोटी पंधरा लाखांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. आबासाहेब यांच्या वारसांतर्फे सांगलीचे अ‍ॅड. प्रशांत नारायणराव जाधव यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आबासाहेब यांचे उत्पन्न शाबीत करण्यासाठी घेतलेल्या अकॅडमीचे उत्पन्नाचे, दूध बिलाची, दुभत्या जनावरांची व शेतीची साक्ष महत्त्वाची ठरली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *