farmar news : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 रुपये हे शेतकर्‍यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेणार : शंभूराज देसाई

SHARE:

 farmar news : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 रुपये हे शेतकर्‍यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेणार : शंभूराज देसाई : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाला प्रती टन 15 रुपये हे शेतकर्‍यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते सातार्‍यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

farmar news : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 रुपये हे शेतकर्‍यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेणार : शंभूराज देसाई

महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची पहिल्यापासूनच पद्धत आहे ही गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी बैठक होत असते. या बैठकीत नैसर्गिक आपत्ती, पूर , दुष्काळ आला की प्रतिटना मागे साखर कारखाने पैसे देत असतात. शेतकर्‍याचे पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही असे देसाई म्हणाले.

60 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले

साखर कारखान्यांना स्वतःच्या उत्पन्नातील पैसे द्यायचे आहेत, असा त्याचा अर्थ आहे असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. हे संकट मोठं आहे. 60 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं मदत करावीच लागणार आहे. साखर उद्योगाची थोडी मदत व्हावी, हा त्या मागचा उद्देश असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले. विरोधकांकडून हा जिजिया कर असल्याच्या टिकेला उत्तर देताना हा कर शेतकर्‍यांकडून घेतला जाणार नाही तर कारखाने देणार असल्याचे देसाई म्हणाले.

शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये कर दिलाच होता मग तो जिजिया कर होता का असा सवाल देसाई यांनी केला आहे.

farmar-news-rs-15-will-be-collected-from-factories-not-farmers-to-help-flood-victims-shambhuraj-desai

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपवर जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना सुनावले होते. एखाद्या पक्षाच्या प्रमुखांनी कडक शब्दात वारंवार सांगून सुद्धा संबंधित व्यक्तीमध्ये बदल होत नसेल तर ज्याने त्याने समजून घेतले पाहिजे. यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही असे शंभूराज देसाई म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *