nagarpalika resarvation news : जत, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ खुले

SHARE:

nagarpalika resarvation news : जत, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ खुले : जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छूक गारद झाले आहेत. आष्टा व जत नगरपालिका तर शिराळा व कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी केवळ खुले झाले आहे. तर तासगाव व पलूस नगरपालिका सर्वसाधरण महिला तर इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व व विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

nagarpalika resarvation news : जत, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ खुले

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणात अनेक जण गारद

ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील 247 नगरपालिका व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात पार पडली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सध्या कवठेमहांकाळ नगरपंचायत वगळता इतर सहा नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहेत. त्यासाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली.

जिल्ह्यातील आष्टा व जत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होणार आहे. सध्या आष्टा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले असल्याने मोठी चुरस होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून वैभव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रविण माने इच्छूक आहेत. जत नगरपालिकेसाठी देखील सर्वसाधारण नगराध्यक्षपद आहे. यापूर्वी दोन निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण होते. या निवडणुकीसाठी सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांची रांग लागली आहे. या ठिकाणी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी होण्याची शक्यता दाट आहे.

तासगावमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे दिग्गज नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. रोहित पाटील व माजी खा. संजयकाका पाटील यांच्या गटात प्रामुख्याने लढत होणार आहे.

विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण आहे. ही निवडणूक महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात लढत होणार आहे. या नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका इच्छूक झाल्या आहेत. पलूस नगरपालिकेसाठी देखील सर्वसाधारण महिला आरक्षण आहे.

इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी होणार का? याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून सध्या माजी नगराध्यक्ष विश्वनाथ उर्फ चिमण डांगे, वैभव पवार, विजय कुंभार, गजानन फल्ले यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉ. संग्राम पाटील, आनंदराव मलगुंडे तर शिवसेनेकडून तालुकाप्रमुख सागर मलगुंडे इच्छूक आहेत.

तर नगरपंचातीसाठी शिराळा व कवठेमहांकाळ खुले झाले आहे. सध्या शिराळा नगरपंचायत होणार आहे. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यात प्रमख लढत होणार आहे. कडेगाव सर्वसाधारण महिला तर आटपाडी व खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षण पडले आहे. थेट नगराध्यक्ष निवडी असल्याने निवडणुकीसाठी जोरदार चुरस होणार आहे.

 नगरपालिका*
आष्टा- सर्वसाधारण
जत- सर्वसाधारण
पलूस- सर्वसाधारण महिला
तासगाव- सर्वसाधारण महिला
इस्लामपूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग
विटा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

 

* नगरपंचायत *
शिराळा- सर्वसाधारण
कवठेमहांकाळ- सर्वसाधारण
कडेगाव- सर्वसाधारण (महिला)
खानापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग
आटपाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *