bihar election news : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसर्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 17 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 20 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.
bihar election news : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल
अर्जांची छाननी ही 18 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 21 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होणार.
अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 23 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.
मतदान – पहिला टप्पा – 6 नोव्हेबर
दुसरा टप्पा – 11 नोव्हेंबर
निवडणुकीचा निकाल – 14 नोव्हेंबर
बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचसोबत सर्व निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
पुरुष आणि किती महिला मतदारांची संख्या किती?
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. निवडणुकीसाठी आम्ही बिहारच्या जनतेचे सहकार्य अपेक्षित करतो. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील.
निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे नोंदवता येतील
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदानाच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे नोंदवता येतील. एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











