miraj panchyat samiti news : मिरज पंचायत समितीवर 27 वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाचा सभापती होणार : मिरज पंचयात समिती सभापती पदाची सोडत झाली. त्यामध्ये मिरज पंचायत समितीसाठी आता अनुसूचित जाती महिला हे सभापती पदासाठी आरक्षण पडले आहे. सोमवार 13 रोजी गणांचे आरक्षण जाहीर होणार आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सभापती कोणत्या मतदार संघातील होणार हे स्पष्ट होणार असल्याने या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
miraj panchyat samiti news : मिरज पंचायत समितीवर 27 वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाचा सभापती होणार
अनुसूचित जाती प्रवर्गातील मसाजी कांबळे हे 27 वर्षांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी होते. तब्बल 27 वर्षांनंतर येथे अनुसूचित जातीचा सभापती होणार आहे. सभापती पद कोणाला मिळते? याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
मिरज पंचायत समितीमध्ये यापूर्वी 22 सदस्य होते. त्यापैकी भाजपचे 10 , अपक्ष 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 7 , तर स्वाभिमानी शेतकरीचा 1 सदस्य होता. गेल्या साडेतीन वर्षांपासून येथे प्रशासक आहे. तालुक्यातील सोनी, भोसे, एरंडोली, सलगरे, आरग, खटाव, मालगाव, गुंडेवाडी, म्हैसाळ, वड्डी, बेडग, नरवाड, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी, बुधगाव, माधवनगर यांसह सर्वच मतदार संघात तयारी सुरू आहे.
मिरज पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे. तब्बल 27 वर्षांनंतर मिरजेच्या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गास सभापती पदाची संधी मिळणार आहे.
मिरज तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीमध्ये भाजपची ताकद मोठी होती. त्यासाठी स्वाभाविकच माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांचे श्रेय मोठे आहे. खासदार विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी दादा गट सक्रिय ठेवला. मात्र आता जयश्री पाटील भाजपमध्ये गेल्याने मिरज तालुक्यातील चित्र बदलणार आहे.
miraj-panchyat-samiti-news-miraj-panchayat-samiti-will-have-a-scheduled-caste-chairman-after-27-years
खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यामध्ये कार्यकर्त्यांची विभागणी होणार, हे निश्चित आहे. जयश्री पाटील यांच्यासोबत जाणार्यांची संख्या वाढते का? हे येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दाखवेल. आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. आ. जयंत पाटील हे सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. योग्यवेळी योग्य कार्यक्रम करण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे कळते. त्यामुळे भाजपनेही आपली सावध पाऊल टाकत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











