zilha parishad news : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत

SHARE:

zilha parishad news : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 61 गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालय तर पंचायत समितीच्या 122 गणाची सोडत ज्या-त्या पंचायत समितीस्तरावर होणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

zilha parishad news : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत

ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबला होत्या. साडेतीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा निवडणूक लागणार आहे. यापुर्वी 2022 मध्ये आरक्षण सोडत झाली होती. मात्र आता नव्याने ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे. सोमवार दि. 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडतीसाठी सभा होणार आहे.

तर पंचायत समितीच्या गणांची सोडत तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार यांच्यास्तरावर होणार आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण कुठले निघणार यावर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. तर अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने हा प्रवर्ग कुठल्या गटांसाठी आरक्षित होणार याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *