zp news : समडोळी, ढालगाव, अंकलखोप, बोरगाव, बुधगाव या गटांवर पुन्हा ओबीसी आरक्षण होऊन अन्याय

SHARE:

zp news : समडोळी, ढालगाव, अंकलखोप, बोरगाव, बुधगाव या गटांवर पुन्हा ओबीसी आरक्षण होऊन अन्याय : सांगली जिल्हा परिषदेसाठी दि.13 ऑक्टोंबर रोजी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये 29 जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती, नामाप्र व महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे पुढील गटांना अनुसूचित जाती, नामाप्र व महिला आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदविलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतीय राज्य घटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही. त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणे गरजेचे आहे. गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती अ‍ॅड.बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

zp news : समडोळी, ढालगाव, अंकलखोप, बोरगाव, बुधगाव या गटांवर पुन्हा ओबीसी आरक्षण होऊन अन्याय

जिल्हा परिषद आरक्षण नव्याने काढा : अ‍ॅड.बाबासाहेब मुळीक

अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी तडसर व पेठ हे गट सलग दुसर्‍यांदा आरक्षित झाले आहेत तर मुचंडी, शेगाव, कडेपूर, देवराष्ट्रे, ढालगाव, अंकलखोप, बोरगाव, बुधगाव, समडोळी या गटांवर नामाप्र आरक्षण पुनरावृत्ती होऊन अन्याय झाला आहे. वास्तविक जाडरबोबलाद, माडग्याळ, कुची, दिघंची, निंबवडे, वाळवा, बावची, चिकुर्डे, संख, बिळूर, करंजे, एरंडोली, कवठेपिरान, सावळज, वाकुर्डे बु., कोकरूड हे जिल्हा परिषद गट नामाप्र आरक्षित होणे आवश्यक होते.

यावेळी बोलताना अ‍ॅड.मुळीक म्हणाले, या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी म्हैसाळ, मालगाव, कवलापूर रांजणी, उमदी, सावळज हे जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आलेले आहेत. यापूर्वी म्हैसाळ जि.प.गट 1997 व 2002, बेडग जि.प.गट 2002 व 2017, मालगाव 2002, कवलापूर 2007, उमदी 2002, रांजणी 2002 व सावळज 2002 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. यामुळे याठिकाणी आरक्षणाची पुनरावृत्ती होऊन या गटांवर अन्याय झालेला आहे.

वास्तविक 2025 च्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मांगले, अंकलखोप, विसापूर, बावची, खरसुंडी, कुंडल, शेगाव हे गट अनुसूचित जातीकरिता आरक्षित होणे आवश्यक होते. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांनुसार आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला नाही त्यामुळे या गटातील अनुसूचित जातींच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.

सर्वसाधारण आरक्षणात खरसुंडी, वांगी, विसापूर, चिंचणी, मणेराजुरी, कुंडल, चिकुर्डे, कोकरूड, एरंडोली, कसबे डिग्रज हे जिल्हा परिषद गट सलग दुसर्‍यांदा सर्वसाधारण झाले आहेत. वास्तविक तडसर, देवराष्ट्रे, येळावी, कवठेएकंद, मणेराजुरी, ढालगाव, कासेगाव, वाटेगाव, पेठ, लेंगरे, हे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण होणे आवश्यक होते. तसेच महिला आरक्षण काढत असताना जवळपास 12 जिल्हा परिषद गटात सलग दुसर्‍यांदा महिला आरक्षण आलेले आहे.

यामुळे जिल्हा परिषद आरक्षण काढत असताना राज्य घटनेला अभिप्रेत असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नसलेने सदरचे आरक्षण राज्य घटना, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जि.प.आणि पं.स.(जागेचे आरक्षण पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नियम 4 व जिल्हा परिषद कायद्याला अनुसरून नाही. आरक्षणावर 17 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हाधिकारी यांचेकडे हरकती नोंदविणेचे आहेत.

याबाबत आम्ही मा.जिल्हाधिकारी यांचेकडे हरकत नोंदविणार आहे व गरज पडल्यास कायदेशीर लढाई लढणार आहे.तसेच ज्या-ज्या गटात आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे अशा गटातील जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन अ‍ॅड.बाबासाहेब मुळीक यांनी केले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *