sangli accident news : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चारचाकी खांबावर आदळून एकाचा मृत्यू : मिरज-सांगली रोडवर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ चारचाकी वाहन भरधाव वेगाने जावून जाहिरातीच्या लोखंडी खांबाला जोरदार आदळून मोठा अपघात होवून चालक विश्वजित दिलीप नाईक (वय 21 रा. 100 फुटी रोड डिमार्ट पाठीमागे लक्ष्मी नारायण कॉलनी गल्ली नं.1 सांगली) याचा जागीच मृत्यू झाला.
sangli accident news : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चारचाकी खांबावर आदळून एकाचा मृत्यू
या घटनेची नोंद गांधी चौकी पोलिस ठाण्यात झाली आहे. सांगली शंभर फुटी येथे राहणारे विश्वजित नाईक हे वैभव नंदकुमार कोळी, ओंकार सुनिल पाटील व अनिकेत या आपल्या मित्रांसोबत (एम.एच.12 डी.एम.6774) या क्रमांची अल्टो चारचाकी वाहन घेवून सकाळी मिरजेकडे आले होते. परत येताना आरवट्टगी पेट्रोल पंपाशेजारीच असलेल्या क्रोमा शोरूम जवळ अचानक गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधावपणे समोर असलेल्या जाहिरातीच्य लोखंडी अॅगलला कार धडकली.
धडक इतकी जोराची होती. गाडीचालक विश्वजित नाईक याचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीमधील वैभव नंदकुमार कोळी, ओंकार सुनिल पाटील व अनिकेत हे जखमी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.
या अपघाताची माहिती गांधी चौकी पोलिस ठाण्यास मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. अपघातील जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडल्यामुळे नाईक कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात ठाण्यात झाला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











