sangli crime news : सांगलीत अवघ्या वर्षाचे लेकरू चोरीस विश्रामबाग चौकातल्या घटनेनं खळबळ

SHARE:

sangli crime news : सांगलीत अवघ्या वर्षाचे लेकरू चोरीस विश्रामबाग चौकातल्या घटनेनं खळबळ : पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान मधील एक कुटुंब दीड हजार किलोमीटरवरून सांगलीत आले होते. रस्त्याकडेला त्यांनी संसार मांडला होता. दिवसभर सिग्नलजवळ फुगे विकून ते संसाराचा गाढा ओढत होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्याचं एक वर्षाचं देखणं लेकरू पहाटे चोरट्याने पळवून नेले.

sangli crime news : सांगलीत अवघ्या वर्षाचे लेकरू चोरीस विश्रामबाग चौकातल्या घटनेनं खळबळ

त्यानंतर एकच खळबळ उडाली. विश्रामबाग चौकात ही घटना घडला. ऐन दिवाळीत लेकरू चोरीच्या घटनेने पोलिसही गहिवरले. विश्रामबागसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तातडीने रवाना झाले. दिवसभर त्यांचा शोध सुरू होता. रात्री उशीरापर्यंत पोलिसांना यश आले नव्हते.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानच्या कोटा येथील एक कुटुंब उदरनिर्वाहसाठी सांगलीत आले होते. त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा होता. दररोज सकाळी ते सारेच विश्रामबाग चौकात फुगे विकायचे. त्यातून पैसे मिळवून ते कुटुंब चालवायचे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे कुटुंब चौकातील दुभाजकावरच झोपायचे. जगण्यासाठी त्या कुटुंबाची धडपड पाहून अनेकांना पाझर फुटायचा.

अनेकजण त्यांच्याकडून फुगे घ्यायचे. कालही दिवाळीसाठी सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी त्यांना नवे कपडे दिले होते. दिवाळीच्या सणात त्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. काल नेहमीप्रमाणे ते रात्री त्याचठिकाणी झोपले होते. पहाटेच्या सुमारास त्याचे एक वर्षाचं लेकरू चोरट्याने पळवून नेले. त्यानंतर त्याने मातेस लेकरू दिसत नसल्याने तिने टाहो फोडला. परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अनेकांना त्या मातेने माझं बाळ चोरीलं गेलं, शोधून द्या, अशी विनंती केली. त्यानंतर ती माता विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेली. त्याठिकाणी निरीक्षक सुधीर भालेराव यांना माहिती दिली.

त्यांनी तातडीने मुलाच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथक रवना केले. ही बाब सार्‍यांना समजल्यानंतर एलसीबीचे पथकही त्या बाळाच्या शोधासाठी रवाना केला. रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. पण, ते बाळ शोधून काढायचेच, असा चंग आता पोलिसांनी बांधला आहे.

बाळ चोरीचा घटना…

मिरजेतील शासकीय रुग्णालयातून काही महिन्यांपुर्वी बाळ चोरीची घटना घडली होती. त्यानंतर 48 तसानंतर महात्मा गांधी पोलिसांनी त्या बाळाचा शोध घेतला. अगदी सुखरूपणे त्या मातेकडे बाळ सुपुर्द केले. बाळ चोरीच्या या दुसर्‍या घटनेनंतर याची टोळी सक्रीय आहे का, असा प्रश्न काही जणांनी यावेळी उपस्थित केला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *