lslampur political news : उरूण ईश्वरपूरमध्ये आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार : उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांच्या निनादात मलगुंडे दादांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले.
lslampur political news : उरूण ईश्वरपूरमध्ये आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते राजारामबापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले, आनंदराव मलगुंडे हे अजातशत्रू, मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेतील कामाचा दीर्घ अनुभव आहे.
त्यांच्या वडिलांनी स्व.बापूंना मोठी साथ दिली आहे. आपल्या पक्षाने 1985 साली 31 पैकी 29 जागा जिंकून नगरपालिकेची सत्ता मिळविली होती. त्यानंतर आपण 31 वर्षे या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली. यामध्ये दादांचा वाटा मोठा आहे. येत्या 4-6 दिवसात निवडणूका जाहीर होतील, कामाला लागा. गेल्या 9 वर्षात शहरात काय विकास झाला? चालू होती, ती कामे बंद कशी पडली? हे जनतेला सांगा,जनता निश्चित साथ देईल.
शहाजी पाटील म्हणाले, पक्षाचे राज्यसरचिटणीस रविंद्र पवार यांनी मलगुंडे दादांच्या उमेदवारास मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी हे अर्ज घेऊन 4 दिवसात भरून द्यावेत. यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी उमेदवारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नेते व संघटनेचा विश्वास सार्थ करू असा विश्वास व्यक्त केला.
प्रा.शामराव पाटील, खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील, सुरेंद्रदादा पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील, अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील, पिरअली पुणेकर, अरुण कांबळे, शंकरराव चव्हाण, रोझा किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, संग्राम जाधव, दिग्विजय पाटील, सचिन कोळी, स्वरूप मोरे यांच्यासह जेष्ठ, युवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी आभार मानले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











