kolhapur zp news : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबाबत 24 हजार हरकती : जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभाग रचना 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान या रचनेवर जिल्ह्यातून तब्बल 23 हजार 820 हरकती घेण्यात आल्याने याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
kolhapur zp news : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबाबत 24 हजार हरकती
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नंतर नगरपालिका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका घेण्याचे सुतोवाच नेत्यांकडून होत होते.
दरम्यान मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर राजकीय संदर्भ बदलले आहेत. अजूनही सर्व शेतकर्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. पुन्हा पाऊस सुरू झाल्यने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांचे लक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांकडे लागले आहे. यासाठी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत वरीलप्रमाणे हजारो हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. 7 नोव्हेंबरला मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता 31 तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या आहेत हरकती
विचित्र पद्धतीने प्रभाग फोडण्यात आले आहेत.
नागरिक वार्ड 6 मध्ये रहायला आहे आणि त्याचे मतदान वार्ड क्रमांक 7 मध्ये दाखवण्यात आले आहे.
संलग्न भाग वगळला आहे. यामुळे आरक्षणातही बदल झाला आहे.
नगरपालिका, पंचायती आलेल्या हरकती
जयसिंगपूर नगरपालिका : 9882
शिरोळ नगरपालिका : 2498
आजरा नगरपंचायत : 2212
वडगाव नगरपालिका : 1783
कुरूंदवाड नगरपालिका : 1643
गडहिंग्लज नगरपालिका : 1448
चंदगड नगर पंचायत : 1344
हातकणंगले नगर पंचायत : 983
हुपरी नगरपालिका : 926
कागल नगरपालिका : 678
पन्हाळा नगरपालिका : 214
मलकापूर नगरपालिका : 124
मुरगुड नगरपालिका : 85
एकूण 23,820
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











