ashta news : आष्ट्यात पुतळा बसवण्यापूर्वी रोखला : आष्टा येथे परवानगीशिवाय बसवण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा आज जिल्हा प्रशासनाने आज सांगलीत रोखला. भर दुपारी हा पुतळ्या रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांनी सदरचा आष्ट्यातील पुतळ्या समितीशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुतळा पुन्हा मुर्तीकाराकडे सुरक्षित नेण्यात आला.
ashta news : आष्ट्यात पुतळा बसवण्यापूर्वी रोखला
तणावाचे वातावरण ; पुतळा पुन्हा मुर्तीकाराकडे रवाना.
आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. पुतळा समितीने लोकवर्गणीतून पुतळा तयार करण्यास सुरूवात केली. पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्यासाठी तब्बल 32 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला. हा पुतळ्याचा चबुतरा अद्याप झालेला नाही. तथापि हा पुतळा एका संस्थेच्या नियंत्रणाखाली सुरक्षित ठेवण्यात येणार होता.
त्यासाठी आष्ट्यातील नागरीकांनी आज तो पुतळा नेण्यासाठी मिरजेत आले होते. याबाबतचे पत्रही प्रशासनास दिल्याचे सांगण्यात आले. दुपारी एकनंतर हा पुतळा एका टेम्पोंतून सांगलीतून आष्ट्याला नेण्यात येत होता. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांसह आष्टा पोलिसांनी बायपास रस्त्यावर तो टेम्पो रोखला. त्यानंतर आक्रमक नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
आष्टा शहर पुतळा समिती व आष्टा शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आदोलन करण्यात आले. पुतळा नेल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत हा तणाव होता. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरूण सुगावकर, निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, दंगल नियंत्रण पथकाची तुकडी दाखल झाली.
अचारसंहिता लागू झाल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आंदोलकांना विनंती केली. त्यानंतर शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सदरचा पुतळा हा पुन्हा कारागिराकडे पोलिस बंदोबस्त सुरक्षित नेण्यात आला. परवानगीनंतरच हा पुतळा देण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











