election news : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर,

SHARE:

election news : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर,:  राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून, त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

election news : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर,

मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल

नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

गुलाबी मतदान केंद्र

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिव्यांग मतदार, तान्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करु दिले जाईल. तसेच काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून त्यात सर्व अधिकारी या महिला असतील.

विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक

कोकण – 17
नाशिक -49
पुणे -60
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55

उमेदवारांच्या खर्चात वाढ

यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, नगरपालिका उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?

अ वर्ग
अध्यक्षपद – 15 लाख
नगरसेवक – 5 लाख
ब वर्ग
अध्यक्षपद – 11 लाख 25 हजार
नगरसेवक – 3 लाख 50 हजार
क वर्ग
अध्यक्षपद – 7 लाख 50 हजार
नगरसेवक – 2 लाख 50 हजार

नगरपंचायत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?

अध्यक्षपद – 6 लाख
नगरसेवक – 2 लाख 25 हजार

मतदारांच्या सोयीसाठी नवीन अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लरेशन घेतलं जाईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *