ashta election news : आष्ट्यात विशाल शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार

SHARE:

 

ashta election news : आष्ट्यात विशाल शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार: आष्टा नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आष्टा शहर विकास आघाडी कडून स्व.माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन, माजी उप नगराध्यक्ष विशाल विलासराव शिंदे यांचे नाव आ.जयंतराव पाटील यांनी शक्तीस्थळ या विलासराव शिंदे यांच्या स्मृतिस्थळी घोषित केले. यावेळी विशाल शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला.

ashta election news : आष्ट्यात विशाल शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार

जयंत पाटील यांनी केले नाव जाहीर

आगामी आष्टा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता खुल्या गटास आरक्षण पडले आहे. आष्टा शहर विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी 11 जण इच्छूक होते. तशी त्यांनी अर्जाद्वारे मागणी केली होती. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढली होती.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, आष्टा शहर विकास आघाडीतर्फे सर्वानुमते विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असून शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येतील.

विशाल शिंदे म्हणाले, 2016 ते 2024 या काळात आम्ही जयंत पाटील व विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 कोटीची विकास कामे पूर्ण केली असून पुढील काळात ही लोकाभिमुख विकास करण्याचा आमचा माणस आहे. भव्य क्रीडांगण, पायाभूत सुविधा व शासनाच्या विविध योजना पालिकेच्या वतीने आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

आष्ट्यातील जनता सुज्ञ असून आष्ट्याचा बिहार होऊ देणार नाही. आ.जयंत पाटील व वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करू. यावेळी झुंझारराव पाटील, झुंझारराव शिंदे, दिलीप वग्याणी, संग्राम जाधव, माणिक शेळके, तेजश्री बोंडे, भाग्यश्री शिंदे, झीनत अत्तार, विजय मोरे, रामचंद्र शिंदे, शिवाजी चोरमुले, धैर्यशील शिंदे, वरदराज शिंदे, विश्वराज शिंदे, सतीश माळी, अर्जुन माने, रामचंद्र सिद्ध, दीपक शिंदे, शकील मुजावर, अंकुश मदने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *