vita murdar news : विट्यात अनैतिक संबंधातून युवकाचा खून

SHARE:

vita murdar news : विट्यात अनैतिक संबंधातून युवकाचा खून : अनैतिक संबंधातून विट्यात एका युवकाचा कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने वार करून खून झाला आहे. साई गजानन सदावर्ते (वय 35) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान साळशिंगे रस्त्यालगत आयटीआय कॉलेज समोर घडली.

vita murdar news : विट्यात अनैतिक संबंधातून युवकाचा खून

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या आयटीआय कॉलेज परिसरात राहतात. आज रात्री सदावर्ते हे रस्त्याने चालत जात असताना मागून दोन दुचाकीवरून बुरखादारी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला आणि पळून गेले. तीन ते चार हल्लेखोर असावेत.

त्यांनी चेहर्‍यावर आणि डोक्यावर रुमालसारखे फडके बांधलेले होते. मृत साई सदावर्ते यांच्या मानेवर पाठीमागून कोयत्या सारख्या शस्त्राने जोरदार वार करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साई सदावर्ते यांना येथील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु दोन तासानंतर मानेवरची जखम खोलवर जखम गेली असल्यामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. परिणामी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असे पोलिसांनी सांगितले. तसेच हा संबंधित खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *