nagarpalika election news : मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराला मुभा

SHARE:

nagarpalika election news : मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराला मुभा : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचार धुमधडाक्यात सुरु असताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. अवघ्या पाच दिवसांवर मतदान आले आहे. प्रचाराचा कालावधी संपण्यासाठी चार दिवस हातात होते. मात्र, अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी 30 नोव्हेंबर 5 पर्यंत प्रचाराची मुदत होती. आता त्यामध्ये वाढ करून नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.

nagarpalika election news : मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराला मुभा

नगरपालिका, नगरपंचायतच्या प्रचारासाठी एक दिवसाची मुदतवाढ

जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीसाठी रणधुमाळी सुरु आहे. इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव आणि पलूस नगरपालिका आणि शिराळा व आटपाडी नगरपंचायतीचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. मात्र चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. पक्षीय उमेदवार वगळता अपक्ष उमेदवारांना मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ चारच दिवस मिळणार असल्याचे तर्कवितर्क लढविण्यात येत होते.

यापूर्वी निवडणूक आयोगाने मंगळवारी 2 डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या वेळेत बदल केला होता. त्यानुसार आता 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता नगरपंचायतींच्या निवडणुकीत 1 डिसेंबरला सायंकाळी 5 पर्यंत प्रचार करता येणार आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबरला बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उमेदवाराना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार होता. त्यामुळे हा प्रचाराचा कालावधी वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रचारासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याने सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आता मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचार करता येणार असल्याचे स्पष्ट झाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *