kasbe digrak crime news : कसबेडिग्रज येथे दुकान फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये असणार्या आष्टा रोडवरील एक दुकान मध्यरात्री चोरटयांनी फोडले. डकणाचे शटर उचकटून आत प्रवेश करत 25 हजारांची रोकड आणि साहित्य असा एकूण 1 लाख 29 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
kasbe digrak crime news : कसबेडिग्रज येथे दुकान फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास
सदर चोरीची घटना हि रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रकाश फंचू चौगुले (वय 35 रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रकाश चौगुले हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये राहतात. गावातीलच आष्टा रोडवर विद्यासागर सेल्स नावाने त्यांचे दुकान आहे. शनिवारी नेहमी प्रमाणे सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास चौगुले हे दुकान बंद करून घरी गेले होते.
यावेळी अज्ञात चोरटयांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या शटरची कुलूप लावायची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेले 25 हजार रुपये रोख आणि दुकानातील विक्रीचे साहित्य असा एकूण 1 लाख 29 हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास चौगुले हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली.
यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











