sangli election : मतदान झाले, पण मतमोजणी 21 डिसेंबरला जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतच्या 635 उमेदवारांच्या पदरी प्रतिक्षा : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला आहे. नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. निवडणूक 20 डिसेंबरला होईल. त्याचा नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, या कारणांमुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
sangli election : मतदान झाले, पण मतमोजणी 21 डिसेंबरला जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतच्या 635 उमेदवारांच्या पदरी प्रतिक्षा
नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाच्या 635 उमेदवारांना आता 21 डिसेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होईल. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले.
ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले आहे. त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही.
मतमोजणी पुढे गेल्याने प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील. ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागेल. शिवाय सर्व स्ट्राँग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











