tasgaon news : तासगावात बोगस मतदानावरून आबा काका गट भिडले

SHARE:

गणपती मंदिर परिसरात तणाव; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात

tasgaon news : तासगावात बोगस मतदानावरून आबा काका गट भिडले : तासगाव नगरपरिषद निवडणुकीदरम्यान बोगस मतदानाच्या आरोपांवरून शहरात मंगळवारी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक चारमधील गणपती मंदिराशेजारील शाळेत असलेल्या मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांत अक्षरशः खडाजंगी उसळली. शिवीगाळ, ढकलाढकली आणि अंगावर धावून जाण्याच्या घटना घडताच परिसरात गोंधळाचे वातावरण पसरले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमाव पांगविल्याने अनर्थ टळला.

tasgaon news : तासगावात बोगस मतदानावरून आबा काका गट भिडले

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही प्रभागांत बोगस मतदानाच्या तक्रारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नोंदवल्या जात होत्या. त्यानंतर आमदार रोहित पाटील स्वतः प्रभाग क्रमांक चारच्या गणपती मंदिरासमोरील बूथवर दाखल झाले. येथे बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांच्या बूथवर थांबण्यावरून आमदार पाटील व पोलिसांमध्ये चांगलाच वाद रंगला.

दरम्यान, पुन्हा बोगस मतदानाची तक्रार झाल्याने रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याचवेळी स्वाभिमानी आघाडीचे नेते प्रभाकर पाटील हेही आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोहोचले. दोन्ही नेते कार्यकर्त्यांसह आमनेसामने येताच परिस्थिती क्षणात चिघळली. दोन्ही बाजूंकडून शिवीगाळ, ओरडाओरड सुरू झाली तर काही कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. काही क्षण वातावरण प्रचंड तापले होते.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून दोन्ही गटांना मागे ढकलले आणि मतदान केंद्र परिसरात नियंत्रण प्रस्थापित केले. पुढील तणाव टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस फौज तैनात करण्यात आला.
तासगावातील निवडणुकीच्या दिवशीच दोन प्रभावी गट आमनेसामने येत शहरात तीव्र तणाव निर्माण झाला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *