kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची कारला धडक

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची कारला धडक : सांगली : पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबेडिग्रज गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंप समोर भरधाव वेगाने कारला ओव्हरटेक करत पुढे जाणार्‍या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात नवनाथ पेट्रोल पंपासमोर झाला.

kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची कारला धडक

अपघातात दुचाकी चालक महावीर भरमा चिंचवाडे (वय 57, रा. माळवाडी, ता. पलूस) आणि हनिनाबी तानेखान (रा. वाळवा) असे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शमशुद्दीन गुलाब तानेखान (वय 66 रा. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार महावीर चिंचवडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी शमशुद्दीन तानेखान हे सेवा निवृत्त सैनिक असून ते कुटुंबियांसह वाळवा मध्ये राहतात. तानेखान हे त्यांच्या पत्नी जखमी हनिनाबी यांच्या सोबत त्यांची कार (क्र. एमएच 12 केटी 6232) ने सोमवारी दुपारी आष्टयाहून सांगलीकडे राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते.

कसबे डिग्रज गावाच्या हद्दीतील नवनाथ पेट्रोल पंपासमोर दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ते आले होते. त्यावेळी अचानक चारचाकीस ओलांडून पुढे जाण्याकरिता आलेल्या दुचाकीची धडक चारचाकीच्या पुढील चाकास बसली. यावेळी शमशुद्दीन यांनी तातडीने ब्रेक दाबला. परंतु तोपर्यत दुचाकीस्वार महावीर चिंचवाडे हा चारचाकीच्या पुढील बाजूस पडून गंभीर जखमी झाला.

चारचाकीतील शमशुद्दीन यांची पत्नी हसिनाबी यांच्या देखील डोक्यास दुखापत झाली. दोन्ही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *