miraj news : दिवसभराच्या चर्चेनंतर रात्री उशीरा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध : मिरजेतील प्रभाग सहा मधील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी वाहनाचा गैरवापर आणि धकीत रक्कमेबाबत आक्षेप घेतला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निवडणुक निर्णय अधिकारी लष्करे यांनी मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळून लावला. मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरविला आहे.
miraj news : दिवसभराच्या चर्चेनंतर रात्री उशीरा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध
मिरजेतील प्रभाग सहा मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर प्रभाग सहा मधील भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी निवडणूक आयोगाकडे मैनुद्दीन बागवान यांनी सभापती असताना महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर करून थकबाकी ठेवली होती. थकबाकी भरली नाही अशी तक्रार केली होती.
तसेेच याबाबत महापालिकेचे त्यावेळचे तत्कालीन आयुक्त वैभव साबळे यांनी त्यांना नोटीस दिली होती. अशी तक्रार केली होती. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी याबाबत सुनावणी घेतली.
मैनुद्दीन बागवान यांनी महापालिकेच्या वाहनाचा केलेला गैरवापर व दंड याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आणि तक्रारदार अल्लाबक्ष गाडेकर व मैनुद्दीन बागवान या दोघांचेही म्हणणे ऐकून घेवून तसेच महापालिकेच्या थकीत दंड याबाबत माहिती घेतली. महापालिकेने कुठल्याही प्रकारची शास्ती रक्कमेबाबत ठेवण्यात आले नाही. त्यामुळे मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळण्यात आला.
.रात्री उशीरापर्यंत म्हणणे मांडण्यात येत होते. दोन्ही बाजूच्या कायदेतज्ज्ञांनी कायद्याचा किस पाडला.दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मिरज महापालिका आवारात प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी महापालिकेसमोर फौजफाटा तैनात केला आहे. दोन्ही बाजूचे वातावरण तणावपूर्ण होते. रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती. मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी दिवशी अनेक अर्जावर आक्षेप घेण्यात आले, उमेदवारांच्या वकिलांच्या फौजांसह दोन्ही बाजूच्या म्हणणे तपासू निवडणूक अधिकार्यांनी दिले निर्णय . मिरजेतील प्रभाग क्र 5,7,20 मध्ये एकूण 171 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते पैकी 2 अर्ज अवैध ठरले व 169 अर्ज वैध ठरले असून अर्ज छाननी दिवशी अनेक आक्षेप घेण्यात आले.
प्रभाग क्र 7 ( क ) मधून काँग्रेसच्या गायत्री कुल्लोळी याच्या अर्जावर बानू मुसा जमादार यांनी महापालिकेच्या थकबाकी असलेबाबत आक्षेप घेतला होता निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कदम यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून गायत्री कुल्लोळी यांचा अर्ज वैध ठरवला , तसेच प्रभाग क्र 4 ( अ ) मधून सिद्धी पिसे यांच्या अर्जावर जन्म दाखल बाबत भाजप उमेदवार अपर्णा शेटे यांनी आक्षेप घेतला याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दाखल्याची शहानिशा करून. पिसे यांचा अर्ज वैध ठरवला . मैनुद्दीन बागवान यांच्या बाजूने अॅड. इर्शाद पालेगार यांनी काम पाहिले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











