jat election news : जतमध्ये काँग्रेस- अजित पवार गट एकत्र येण्याच्या हालचाली: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच जत तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपरिषद निवडणूकीत जतमध्ये काँग्रेसने भाजप खालोखाल मोठे यश मिळवले. तुलनेने अजित पवार राष्ट्रवादी गटाला मोठे अपयश यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांचा एक ही समर्थक विजय होऊ शकला ही चूक दुरुस्त करण्याची माजी आमदार विलासराव जगताप यांच्या समर्थकांची मागणी होत आहे.
jat election news : जतमध्ये काँग्रेस- अजित पवार गट एकत्र येण्याच्या हालचाली
तसेच माजी आमदार विक्रम दादा सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती बदलण्याची मागणी केली आहे.त्यामुळेच महायुतीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या अजित पवार गटाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जतच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जत हा पारंपरिकरीत्या काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संपर्क अभियानावर भर दिला जात आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी काँग्रेसने आता ’सोशल इंजिनिअरिंग’ आणि ’राजकीय तडजोडी’ यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
राज्यात जरी समीकरणे वेगळी असली, तरी जत तालुक्यात स्थानिक पातळीवर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि अजित पवार गट एकत्र येण्याची चिन्हे आहेत.दोन्ही गटांना तालुक्यातील भाजपच्या वाढत्या प्रभावाचा सामना करायचा आहे. तर दुसरीकडे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांची भूमिका काय राहणार याकडेही तालुक्याचे लक्ष आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकते.काँग्रेस आणि अजित पवार गट एकत्र आल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. भाजप सध्या आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर स्थानिक नेत्यांच्या बळावर खिंड लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, जर काँग्रेसने ही ’छुप्या युती’ची खेळी यशस्वी केली, तर जतमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
युतीच्या अनेक फेर्या होऊनही जत नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली.मात्र, जिल्हा परिषदेच्या मोठ्या रणधुमाळीत अजित पवार गटाची साथ मिळाल्यास काँग्रेसचे पारडे जड होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











