jayant patil news : राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टतर्फे दोन कोटीचे विकासकामे : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्राच्या शिवारातील पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरण,जेसीबीने नाले खुदाई, वाडी-वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नव्या बोअरची खुदाई,व्यायाम शाळांची दुरुस्ती आणि साहित्य पुरवठा आदी पावणे दोन कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत.
jayant patil news : राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टतर्फे दोन कोटीचे विकासकामे
राजारामबापू साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन या कामांना गती दिली असल्याने कारखाना कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांच्यामध्ये उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजारामबापू साखर कारखान्याने संपूर्ण राज्यात सर्वाधिक 1300 बोअरची खुदाई करून त्यावर हातपंप बसविण्या चा विक्रम केला आहे.
राजारामबापू साखर कारखान्याचा राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्ट म्हणजे कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्यासाठी वरदानच ठरला आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांना हातभार लावणारे अनेक उपक्रम राबविले आहेत. मात्र मध्यंतरी काही तांत्रिक कारणांनी ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करणे बंद होते.
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी यातून मार्ग काढत पुन्हा ट्रस्ट च्या माध्यमातून केल्या जाणार्या विकास कामांना गती दिली आहे. त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीवरून तब्बल 78 गावातील 91 पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण केले आहे. या रस्त्यांच्यावर 30 ब्रासपासून 100 ब्रास पर्यंत मुरूम टाकून हे पाणंद रस्ते दुरुस्त केले आहेत. याचा त्या – त्या शिवारातील शेतकर्यांना मोठा लाभ झाला आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील नाल्यांची जेसीबीने साफ सफाई केली आहे.
कारखान्याने राज्यातील सहकार क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी म्हणजे वाडी – वस्त्यावर खुदाई केलेल्या बोरिंग. कारखान्याच्या वतीने 1300 बोअरिंग मारल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे,हे ग्रामपंचायत,जिल्हा परिषद किंवा सरकारचे काम आहे. मात्र एखाद्या साखर कारखान्याने इतक्या मोठ्या प्रमाणात बोअर खुदाई केलेले हे राज्यातील दुर्मिळ उदाहरण आहे. तसेच कार्यक्षेत्रातील अनेक गावातील व्यायाम शाळा दुरुस्त केल्या असून अनेक व्यायाम शाळांना नवीन व्यायामाचे साहित्य दिले आहे.
तसेच उरुण ईश्वरपूर बस स्थानक, येथील लमान तांडे वा नरसिंह पूर येथील शाळेत पाणी शुद्धीकरण संचालक बसविले आहेत. याशिवाय दुर्धर आजार,मुला-मुलींचे शिक्षणास आर्थिक मदत,शेतकर्यांच्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या विकास कामांचे आणि योजनाचे शेतकरी व सभासदांच्याकडून जोरदार स्वागत केले जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











