haripur election news : रेषा ओढून राजकारण, हरिपूरच्या मोहिते घराण्यानी पुन्हा दाखवली ताकद

SHARE:

haripur election news : रेषा ओढून राजकारण, हरिपूरच्या मोहिते घराण्यानी पुन्हा दाखवली ताकद : मिरज तालुक्याच्या राजकीय इतिहासात हरिपूरचे मोहिते घराणे हे नाव केवळ ओळखीचे नाही, तर विश्वासाचे, सातत्याचे आणि प्रामाणिकतेचे प्रतीक बनले आहे. या घराण्यातील अशोक मोहिते यांनी आपल्या पत्नीच्या रूपाने चौथ्यांदा मिरज पंचायत समितीच्या सभागृहात पाऊल ठेवले आणि पुन्हा एकदा आपली राजकीय पकड सिद्ध केली.

haripur election news : रेषा ओढून राजकारण, हरिपूरच्या मोहिते घराण्यानी पुन्हा दाखवली ताकद

सन 2002 पासून पंचायत समितीच्या सभागृहात ज्यांनी कायम लक्ष वेधून घेतले, असे हे व्यक्तिमत्त्व-कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी-परंतु पक्ष बदलला तरी जनतेशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

यंदाच्या निवडणुकीत हरिपूरच्या मोहिते घराण्याने एकजुटीचे दर्शन घडवत राजकारणाला केवळ विजयाचा नव्हे, तर मूल्यांचा अर्थ दिला. अशोक मोहिते, विकास मोहिते, शिवाजी मोहिते, गणेश मोहिते आणि इतर कुटुंबीयांनी खांद्याला खांदा लावत समडोळी पंचायत समितीवर शोभा मोहिते यांना काँग्रेसच्या चिन्हावर विजयश्री मिळवून दिली. ही केवळ निवडणूक नव्हती, तर घराण्याच्या विश्वासार्हतेची साक्ष होती.

मोहिते घराण्याचे वैशिष्ट्य एकच-आपल्या सोबत उभ्या असलेल्या उमेदवाराशी ते प्रामाणिक राहतात. याची प्रचिती यंदा पुन्हा एकदा आली. समडोळी जिल्हा परिषद गटात काँग्रेसकडून दस्तगीर मुजावर उमेदवार होते. मुस्लीम समाजाचे उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात अपप्रचाराचा भडीमार सुरू होता.

हरिपूरमध्ये एकही मुस्लीम मतदार नाही, दस्तगीरचा इथे टिकाव लागणार नाही 200 मते म्हणजे खूप, अशा कुजबुजाही रंगात होत्या.
पण रेषा ओढून, सरळ राजकारण करणारे मोहिते कुटुंबीय अशा अफवांना बळी पडणारे नव्हते. त्यांनी मतभेदांच्या भिंती तोडल्या आणि हरिपूरमधून दस्तगीर मुजावरांना तब्बल 2076 मते मिळवून दिली.

एकही मुस्लीम मतदार नसताना, आणि समाजविरोधी प्रचार सुरू असतानाही हरिपूरने दाखवलेली सामाजिक एकता आणि राजकीय प्रगल्भता ही केवळ निवडणुकीची आकडेवारी नव्हे, तर माणुसकीचा विजय होता. ही काही पहिलीच वेळ नव्हती. मागील पंचवार्षिकमध्येही समडोळीच्या सविता कोळी यांना मोहिते कुटुंबीयांनी मोठ्या मनाने, मोठ्या मतांनी साथ दिली होती.

एकंदरीत पाहता, राजकारण कसे खेळावे याचा वस्तुपाठ हरिपूरच्या मोहिते घराण्याने दिला आहे.
दगा न देणारे, जे आहे ते तोंडावर बोलणारे, आणि जे बोलतात ते कृतीत उतरवणारे-
हीच मोहिते यांची खरी ओळख आहे, जी यंदा पुन्हा एकदा अधिक ठळक, अधिक गडद होऊन समोर आली आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *