मे 2023 साली घडला होता गुन्हा
kavtepiran news : कवठेपिरान येथील टेलरच्या घरात दरोडा टाकणार्या आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील एका टेलरच्या घरात मध्यरात्री घुसून दगडाने मारहाण करत गळा पकडून जीवे मारण्याची धमकी देत 8 लाख 66 हजारांचा दरोडा टाकणार्या सराईत चोरट्यास न्यायालयाने दोषी धरून दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. काका सरपंचा काळे (वय 27 रा. चिकुर्डे ता. वाळवा) असे शिक्षा सुनावल्या आरोपीचे नाव आहे.
kavtepiran news : कवठेपिरान येथील टेलरच्या घरात दरोडा टाकणार्या आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी सदरची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता एच. एम. ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये दि. 26 मे 2023 रोजी संशयित काका काळे हा रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरन्नुम शिफा मुजावर यांच्या घरात दरावाची कडी काढून घुसला. यावेळी काळे याने तरन्नुम आणि त्यांच्या आईला आरडाओरडा करायचा नाही असे धमकावून तरन्नुम यांचा गळा पकडून डोळ्यावर दगडाने मारत जखमी केले. घरातील लोखंडी तिजोरीला असलेल्या किल्लोने तिजोरीचे लॉकर उघडले.
लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि एक मोबाईल असा एकूण 8 लाख 66 हजारांचा ऐवज चोरून पलायन केले. घडलेल्या या प्रकारानंतर तरन्नुम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गंभीर ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित काका काळे याला अटक केली.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी सरकारी वकील ग्रामोपाध्ये यांनी काम पहिले. सदरच्या गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून संशयित काका काळे याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











