jain samaj news : इनामधामणीत विद्यासागर महाराजांना आचार्यपद महामहोत्सव

SHARE:

jain samaj news : इनामधामणीत विद्यासागर महाराजांना आचार्यपद महामहोत्सव : प. पू. आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज यांच्या आज्ञानुसार, त्यांच्या परंपरेतील तेजस्वी शिष्य, तपःपरायण, निर्यापक श्रमण, आगमचक्रवर्ती प. पू. मुनीश्री 108 विद्यासागरजी महाराज यांना मिरज तालुक्यातील धामणी येथे आचार्य पदाने अलंकृत करण्यात येणार आहे.

jain samaj news : इनामधामणीत विद्यासागर महाराजांना आचार्यपद महामहोत्सव

धामण्ी येथील श्री 1008 भ. नेमीनाथ दिगंबर जैन मंदिर, श्री 1008 भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल दिगंबर जैन समाज यांच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

इतिहासाची अखंड परंपरा:

एकेकाळी जैन मुनी परंपरा थांबली की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी प. पू. आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी तपशक्तीच्या जोरावर ती परंपरा पुन्हा जागवली. 1924 मध्ये दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मिरज तालुक्यातील समडोळीच्या भूमीवर त्यांना आचार्यपद बहाल करण्यात आले. त्या क्षणानंतर जणू धर्मपारंपरिक दीप पुन्हा प्रज्वलित झाला.
याच भूमीत 1995 मध्ये प. पू. सन्मतीसागर महाराज यांना मुनीदीक्षा मिळाली होती. त्यांचेच तेजस्वी शिष्य, वर्धमानसागरजी महाराज, पुढे आचार्यपदावर विराजमान झाले. आणि आता, त्यांनीच विद्यासागर महाराजांना आचार्यपद देण्याचा निर्णय घेतला आहे – म्हणजेच गुरुपरंपरेची अखंड ज्योत धामणीच्या भूमीतून पुन्हा तेजस्वी होणार आहे!

भव्य आणि दिव्य आयोजन:

या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण जैन समाज उत्साहात आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी या काळात धामणी नगरीत भव्य आणि दिव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूज्य गुरूंना अर्पण, प्रवचन, रथयात्रा, आणि धर्मसभांचा अद्वितीय सोहळा या काळात अनुभवता येणार आहे.

गुरूवार 19 रोजी सकाळी मंगलकुंभ आणणे, ध्वजारोहण व मंडप उद्घाटन होइंल. साडे आठ वाजता जिनाभिषेक आणि महाशांतीधारा, मंगल कलश स्थापन आणि अखंड दीपस्थापना. साडे नउ वाजता आहार चर्या, दुपारी 12 वाजता गणधरवलय विधान, दुपारी 3 वाजता मंगल प्रवचन आणि विविध सवाल, सायंकाळी 7 वाजता जाप्यानुष्ठान आणि संगीत आरती. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम.

शुक्रवार 20 रोजी सकाळी 8 वाजता मंगलकुंभा आणणे, सकाळी साडे आठ वाजता जिनाभिषेक आणि महाशांतीधारा, साडेनउ वाजता आहारचर्या, साडेबारा वाजता मुनीसंघाचे आगमन, दुपारी 1 वाजता भव्य आचार्य पदग्रहण विधी संस्कार, दुपारी 2 वाजता मंगल प्रवचन, सायंकाळी 7 वाजता संगीत आरती.

या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदूकाका सराफचे अतुलजी शहा हे असून, उपाध्यक्ष बेळगावचे प्रसिध्द उद्योजक हेमंतजी लठठे हे आहेत. या प्रसंगी परम शिरोमणी सरंक्षक श्री अशोकजी पाटणी (आर. के. मार्बल) तसेच देशभरातील धर्मनिष्ठ व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी धरमचंद जैन दिल्ली, केवलचंद जैन भोपाल, सुनील जैन दिंडोरी, प्रकाश गंगवाल किशनगढ, शांतीकुमार सोगानी, जयपूर, कैलाश जैन जबलपूर, ममता मुत्तीन, चडचण, तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. विशाल पाटील, आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. रोहित पाटील, आ. सुहास बाबर, आ. सत्यजित देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *