raju shetti news : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 21 आंदोलकांची 3 खटल्यातून निर्दोष मुक्तता; : 2012 च्या ऊस आंदोलन प्रकरणी इंदापूरन्यायालयात दाखल असणार्या 8 पैकी 3 खटल्यातून राजू शेट्टी,सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह 21 आंदोलकांची आज ( दि.16) निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2 हजार 700 रुपयांची पहिली उचल दिली जावी अशी मागणी करुन 2012 साली शेतकरी संघटनांनी ऊस आंदोलन सुरु केले होते.
raju shetti news : राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 21 आंदोलकांची 3 खटल्यातून निर्दोष मुक्तता;
राज्यातील कोणत्या ही साखर कारखानदाराने तोपर्यंत दर जाहीर केले नव्हते. तात्कालिन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्वीकारुन तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. सोलापूर- पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. कुंडलिक कोकाटे हा तरुण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला. त्यानंतर शेकडो शेतक-यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनात्मक संघर्षानंतर राजारामबापू कारखान्याने 2 हजार 500 रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यानंतर उस दराची कोंडी फुटली. राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या आंदोलनाने प्रतिटन 300 रूपये जादा दर मिळाला. मात्र राज्यभरात आंदोलने झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राजू शेट्टी,सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह 21 आंदोलकांवर इंदापूर न्यायालयात आठ दाखल झाले होते. इंदापूर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एच. फारुकी यांच्या न्यायालयात सुरु असणा-या तीन खटल्यातून आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ड.एन. जी.शहा,ड.महेश ढुके,ड.श्रीकांत करे यांनी विनामुल्य स्वरुपात आंदोलकांची बाजू मांडली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











