sudhir gadgil news : आ. सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा अपघात

SHARE:

sudhir gadgil news : आ. सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा अपघात : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वड्डी (ता. मिरज) ते कृष्णा घाट सर्व्हीस रस्त्यावर सांगलीचे भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मोठा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक झाली. धडकेनंतर मोटारीतील एअर बॅग्ज तत्काळ उघडल्यामुळे अनर्थ टळला. आ. गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली. तर दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला मिरज सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

sudhir gadgil news : आ. सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा अपघात

वड्डी-मिरज मार्गावर एअर बॅग्ज उघडल्याने अनर्थ टळला, आ. गाडगीळ यांच्या बोटाला दुखापत

आ. गाडगीळ हे शनिवारी दुपारी कर्नाटकातील उगार येथे गेले होते. तेथून सांगलीकडे परत येत असताना रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वड्डी ते कृष्णा घाट सर्व्हीस रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अचानक यु-टर्न घेतला. या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी आ. गाडगीळ यांच्या मोटारीच्या चालकाने पुरेपूर प्रयत्न केला. परंतू दुचाकीस्वार थेट मोटारीवर येऊन आदळला. जोरदार धडकेनंतर मोटारीच्या आतील एअर बॅग्ज उघडल्यामुळे आ. गाडगीळ यांच्यासह आतील चौघेजण बचावले.

आ. गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली. तर स्वीय सहायक अमोल कणसे, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप, चालक गणपती दरेकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मोटारीचे व दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. तत्काळ 108 रूग्णवाहिका बोलवून त्यास मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारास दाखल केले. अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेतली. महामार्ग पोलिसही धावले. घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवली.

आ. गाडगीळांची नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून विचारपूस

वड्डी (ता. मिरज) ते कृष्णा घाट सर्व्हीस या रस्त्यावर शनिवारी दुपारी अपघात झल्यानंतर आ. सुधीर गाडगीळ यांना दुसर्‍या मोटारीतून यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर आ. गाडगीळ हे निवासस्थानी आले. गाडगीळ घरी आल्यानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दूरध्वनी करून त्यांची विचारपूस केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *