sangli murdar news : सांगलीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून 

SHARE:

मारहाणीच्या त्रासाला कंटाळून खून केल्याचा संशय : संशयित पत्नीसह प्रियकर ताब्यात.

sangli murdar news : सांगलीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून  : शहरातील पोळ मळा परिसरात राहणार्‍या एका तरुणाचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घराबाहेर झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव संशयित पत्नीने रचला होता, परंतु विश्रामबाग पोलीसांनी कौशल्य पणाला लावून खळबळ जनक घटना उघडकीस आणली.

sangli murdar news : सांगलीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आनंद हणमंत सर्जे (वय 28 रा. पोळ मळा, सांगली, मूळ गुड्डापूर ता. जत) असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. सदरची घटना हि गुरुवार दि. 25 जून रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, मृत सर्जे हा मूळचा जत तालुक्यातील गुड्डापूर गावातील रहिवाशी असून तो पत्नी आणि दोन मुलांसह शहरातील पोळ मळा परिसरात राहत होता. सर्जे हा शहरातील एका कपड्यांच्या शोरूम मध्ये काम करत होता. गुरुवारी पहाटे त्यांना पत्नी आणि मेहुण्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत डॉक्टरांनी विश्रामबाग पोलिसांना कळविले. विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली.

त्यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसत होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. आनंद सर्जे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणे आवश्यक असल्याने तज्ञ डॉक्टरांनी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवाविच्छेदन केले. यादरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांची टीम या गुन्ह्याबाबत माहिती घेत होती.

त्यावेळी पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना मयता पत्नी गडबडली. हाच धागा पकडून अधिक चौकशी केली असता नेमका प्रकार समोर आल्याचे समजते. पती आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करून सतत त्रास देतो, याच कारणातून पत्नी आणि तिच्या 24 वर्षीय प्रियकराने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले.

पती हणमंत सर्जे त्यांचे पाय ओढणीने बांधले त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने सर्जे यांच्या छातीवर बसून त्यांचा जीव घेतला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मयत हाणमंत सर्जे यांचा प्रेम विवाह झालेला असून त्यांना दोन मुले आहेत. या खून प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *