आ. डॉ. विश्वजित कदम यांचे सूचक विधान.
zp news : योग्यवेळी आमचे पत्ते ओपन करत डाव साधू : सांगली जि.प. मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता : सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचीच सत्ता येणार आहे. आमची बोलणी सुरु असून प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत. आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू असे सूचक विधान काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
zp news : योग्यवेळी आमचे पत्ते ओपन करत डाव साधू : सांगली जि.प. मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता
दरम्यान, विश्वजित-विशाल एकत्र आल्याचे काही लोकांना बघवत नसल्याने ते आमच्यात वाद असल्याच्या पुड्या सोडत असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला.
सांगलीतील तरुणभारत व्यायाम मंडळाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आले असता पत्रकांशी बोलत होते. यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरे गट यांचे मिळून 30 सदस्य होतात. जयंत पाटील, विशाल पाटील, रोहित पाटील आणि इतर समविचारी लोकांच्या संपर्कात आम्ही आहोत.
लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत. आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू. घटक पक्षांनी मागणी करणे चांगले आहे. आमच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नाराज गट, मित्र पक्षाचा नाराज गट आमच्या संपर्कात आहे. आमची त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. आम्ही कोणताही पॅटर्न नाही तर सांगली पॅटर्न राबवणार आहोत.
आम्ही एकत्र आलेलं अनेकांना बघवलं नाही…
जिल्हा परिषदेबाबत कोणी अफवा पसरवत असतील तर तो रडीचा डाव आहे. यांच्यात नुसतं जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर तो यशस्वी होणार नाही. विशाल पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेत नाराजी नाही. आम्ही सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकसंघ आहोत.
काही लोकांना आम्ही एकत्रित आलेलं बघवत नाही. म्हणून ते पत्रकारांच्या माध्यमातून पुड्या सोडत आहेत. आज ते आम्हाला भाजप मध्ये येण्याच्या ऑफर देत आहेत मात्र एक दिवस असा येईल त्यांना विश्वजित कदम ऑफर देईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











