jayant patil news : सरकारचा हा डल्ला नाही, तर दरोडाच!’; जयंतराव पाटील यांची विधानसभेत तोफ

SHARE:

jayant patil news : सरकारचा हा डल्ला नाही, तर दरोडाच!’; जयंतराव पाटील यांची विधानसभेत तोफ : राज्यातील रस्ते बांधकामासाठी येणारा खर्च पाहिला तर सामान्यांना आकडी येईल अशी परिस्थिती आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणापेक्षा राज्य सरकारच्या यंत्रणा दुप्पट-तिप्पट दराने रस्ते बांधत आहेत. हा निव्वळ भ्रष्टाचार असून सरकार जनतेच्या पैशावर डल्ला मारत जात आहे.तो एक प्रकारे दरोडा टाकत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

jayant patil news : सरकारचा हा डल्ला नाही, तर दरोडाच!’; जयंतराव पाटील यांची विधानसभेत तोफ

रस्ते बांधकामातील अवाढव्य खर्च, केंद्राकडून घटलेला निधी आणि जाहिरातबाजीवर उधळपट्टीवरून सरकारवर घणाघाती टीका

अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना जयंतराव पाटील यांनी आकडेवारीनिशी सरकारचे वाभाडे काढले. राज्याची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर करण्याचे स्वप्न दाखवले जात असले तरी, जमिनीवर मात्र ’मेन इंजिन’ फेल झाल्याचे चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील यांनी रस्ते बांधकामाच्या दरातील तफावतीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील छकAख दर्जेदार रस्ते कमी खर्चात बांधते, मात्र राज्यातील यंत्रणांच्या रस्ते बांधणीचा खर्च अवाढव्य आहे, असे ते म्हणाले.

जाहिरातींचा सुळसुळाट, योजनांचा बोजवारा

सरकारच्या ’इव्हेंट’बाजीवर टीका करताना पाटील यांनी ’उन्नत महाराष्ट्र अभियाना’चे उदाहरण दिले. या अभियानासाठी 51 कोटींची तरतूद आहे, त्यातील 50 कोटी केवळ जाहिरातीसाठी आणि मूळ योजनेसाठी फक्त 1 कोटी रुपये ठेवले आहेत. हे सरकार केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जनतेचा पैसा उडवत आहे, असा आरोप त्यांनी केला. ’सुंदर गाव’ योजनेत कपात झाली असली तरी जाहिरात खर्चात मात्र कपात झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ऊर्जा आणि ग्रामविकास विभागावर ताशेरे

पाणीपुरवठा संस्थांचे मरण: 1800 सहकारी पाणीपुरवठा संस्थांची वीज थकबाकी 70-80 कोटींवर गेली आहे. वैयक्तिक कृषी पंपांना मोफत वीज मिळते, मग या सहकारी संस्थांना का नाही? त्यांना ’कृषी संजीवनी’ योजनेचा लाभ देऊन थकबाकी शून्य करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सौर ऊर्जा घोटाळा: 16 हजार मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम ज्या चार कंपन्यांना दिले आहे, त्यांनी बोगस बँक गॅरंटी दिल्याचा आरोप करत हा 10 हजार कोटींचा ’स्कॅम’ असल्याचे पाटील यांनी म्हटले.

केंद्राकडून मदतीत घट: केंद्राकडून येणार्‍या आर्थिक साहाय्यात 24 हजार 361 कोटी रुपयांची घट झाली आहे. केंद्र घोषणा करते पण पैसे देत नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारता मारता राज्यावरचे कर्ज मात्र तिप्पट झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
’पीएम उषा’ सारख्या उच्च शिक्षणाच्या योजनांच्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे. 2500 कोटींचे बजेट सुधारीत अंदाजात 255 कोटींवर आणले, तर पुढील वर्षासाठी केवळ 105 कोटींची तरतूद आहे. ’परिस स्पर्श’ सारख्या योजना तर बंद होण्याच्या मार्गावर असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *