grampanchyat news : प्रशासक सरपंचांना केवळ वीजबिलाचा आर्थिक अधिकार न्यायालयाचे आदेश, सरपंचांची कोंडी

SHARE:

grampanchyat news : प्रशासक सरपंचांना केवळ वीजबिलाचा आर्थिक अधिकार न्यायालयाचे आदेश, सरपंचांची कोंडी : जिल्ह्यातील फेब्रुवारी 2025 मध्ये मुदत संपलेल्या 147 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. या प्रशासकांना वीज बिले भरण्यासाठी आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच ही कार्यवाही करताना न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिले आहेत.

grampanchyat news : प्रशासक सरपंचांना केवळ वीजबिलाचा आर्थिक अधिकार न्यायालयाचे आदेश, सरपंचांची कोंडी

ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यात विद्यमान सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच, कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी उपसरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समित्या स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या प्रशासकांना आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचातीमध्ये अनेक आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी वीज बिल करण्यासाठी आर्थिक व्यवहारासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र इतर दैनदिन कामकाजाचे आव्हान आजही कायम आहे. त्यामुळे यंत्रणेची कोंडी झाली आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा