sangli zp news : चंद्रकांतदादा घेणार आज महायुतीची बैठक, जिल्हा परिषद सभापती निवडीबाबत होणार चर्चा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये भाजपला सत्ता मिळविण्यात अपयश आल्यानंतर विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी बुधवारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुतीची बैठक बोलावली आहे. सभापती निवडीबाबत चर्चा करण्यासाठी अजितदादा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही बैठकीला निमंत्रित केले आहे.
sangli zp news : चंद्रकांतदादा घेणार आज महायुतीची बैठक, जिल्हा परिषद सभापती निवडीबाबत होणार चर्चा
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये सत्तेसाठी महायुतीचे संख्याबळ असतानाही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. अजितदादा गटाच्या चार सदस्यांनी महाविकास आघाडीकडे मतदान केले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले.
सेनेच्या पाच सदस्य आणि अजितदादा गटाच्या दोन सदस्यांनी भाजपच्या बाजुने मतदान केले. परंतु सत्तेसाठी 31 सदस्यांची गरज असताना संख्याबळ 25 झाले, त्यामुळे सत्ता स्थापन करता आली नाही. महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीने अध्यक्षपद आणि काँग्रेसने उपाध्यक्ष पद मिळवले.
विषय समित्यांच्या चार सभापतींच्या निवडी बुधवारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत झालेल्या चुका टाळून पदे मिळविता येतील, याबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदस्यांची बैठक घेतली आहे. अजितदादा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही बैठकीला निमंत्रित केले आहे.
या बैठकीत सभापती निवडीची निवडणूक तसेच जिल्हा परिषदेतील सभागृहातील कामकाजाबाबतची चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य आणि नेतेही उपस्थित राहणार आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











