sangli zp news : सांगलीत उपाध्यक्ष, सभापतींते खाते वाटप 17 एप्रिल रोजी : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीनंतर खातेवाटपाकडे लक्ष लागले आहे. खातेवाटपासाठी दि. 17 एप्रिलला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उपाध्यक्ष ऋषीकेश लाड यांच्यासह सभापती पृथ्वीराज पाटील आणि सावित्री रवि-पाटील दोन सभापतींना खातेवाटप करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या खातेवाटपाचा निर्णय या सभेत होणार असल्याने सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
sangli zp news : सांगलीत उपाध्यक्ष, सभापतींते खाते वाटप 17 एप्रिल रोजी
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी संगिता पाटील आणि उपाध्यक्षपदी ऋषीकेश लाड यांची निवड 18 मार्चला, त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड दि. 1 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यामध्ये दादासाहेब कोळेकर यांच्याकडे समाजकल्याण तर स्नेहल मोरे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच सावित्री रवी-पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचीही सभापतीपदी निवड करण्यात आली. मात्र, या दोघांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही.
शिक्षण, आरोग्य, बांधकाम, अर्थ, कृषी व पशुसंवर्धन या महत्त्वाच्या विभागांचे वाटप अद्याप प्रलंबित आहे. विशेषतः बांधकाम-अर्थ आणि शिक्षण-आरोग्य या खात्यांसाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर दि. 17 रोजी होणार्या सभेत या सर्व विभागांचे वाटप होईल. या सभेत उपाध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे संबंधित विषय समित्यांचा पदभार अधिकृतपणे सोपविण्यात येणार आहे. याचबरोबर विविध विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.
विषय समित्यांवरील सदस्य निवडीसाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून, दुपारी 12 ते 12.30 या वेळेत अर्जांची छाननी होईल. त्यानंतर अर्ज माघारीसाठी 12.30 ते 1 या वेळेत मुदत देण्यात आली आहे.
दुपारी 2 वाजता सभेला सुरुवात होणार असून, या सभेत अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणार्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा केवळ खातेवाटपापुरती मर्यादित न राहता विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेणारी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सत्ताधारी गटातील अंतर्गत समन्वय आणि खातेवाटपाचा तोल साधत महत्त्वाच्या विभागांचे वाटप कसे केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











