sangli crime news : अंगावर वीज पडून बाजचा तरूण ठार, दोन जखमी : जत तालुक्यातील कंठी ते वाशान रस्त्यावर अंगावर वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.तर दोन तरूण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पांच वाजण्याच्या दरमान घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
sangli crime news : अंगावर वीज पडून बाजचा तरूण ठार, दोन जखमी
अय्याज फिरोज मुजावर ( वय 24) रा. बाज ता.जत हा तरूण जागीच ठार झाला. अक्षय शिवाजी हाके ( वय25) रा.बाज व अनंत दगडू ऐवळे (वय 15) रा.बाज अशी जखमींची नांवे आहेत. मोटरसायकलने मक्पाची वैरण मुरघास आणण्पासाठी बाजमधू कंठीला जात होते. वादळी वार्यासह विजांचा कडकडाट झाला. मोटरसायकल वर वीज पडल्याने मोटरसायकल रस्त्यावर पडली.यात दोघेजण गंभीर जखमी झाले. कंठी ते वाशान रस्तावरील शेजुळ वस्ती जवळ पांच वाजण्याच्पा दरम्यान घडला.
जखमीना कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरानी अय्याज मुजावर यांस मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर यातील दोन जखमीना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हवालदार सतीश वगरे उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल झाले. अधिक तपास हवालदार सतीश वगरे करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










