sangli news : आरोग्य सेविका नियुक्ती पत्र घेऊन महिला उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल 

SHARE:

sangli news : आरोग्य सेविका नियुक्ती पत्र घेऊन महिला उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल  : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक महिला या पदावरील एका नियुक्ती पत्राचा गोंधळ निर्माण झाला आहे. नियुक्ती पत्र घेऊन संबधित महिला उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल झाली. पत्रात नमूद ठिकाणी हजर करून घेतले जात नसल्याची तोंडी तक्रार केली.

sangli news : आरोग्य सेविका नियुक्ती पत्र घेऊन महिला उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल 

आरोग्य विभागातील काही लोकांनी प्राथमिक तपासणी केली, मात्र त्या नावाचा नियुक्तीत समावेश नसल्याचे दिसून आले. दरम्यान या प्रकरणात एका पक्षाचा युवक पदाधिकारी सहभागी असून त्याने संबधितांकडून नोकरी लावण्याच्या हमीवर लाखो रूपये उखळल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात गतवर्षी कर्मचारी भरती झाली. त्याबाबतची सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर बर्याच दिवसांनी म्हणजे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरूणी आरोग्य सेविका पदाची ऑर्डर घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाली. सदरच्या ऑर्डरवर पहील्या पानावर 7 आक्टोंबर 2024 ही तारीख असुन शेवटीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या ठिकाणी मात्र 15 नोव्हेंबर 2025 ही तारीख आहे. त्या खाली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तृप्ती धोडमिसे यांचा उल्लेख आहे.

धोडमिसे यांची बदली ऑगष्ट 2025 या महिन्यात झाली असताना नोव्हेंबर 2025 या महिन्यातील ऑर्डरवर त्यांची सही कशी हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय ऑर्डर पहील्या पानावर आक्टोंबर 2024 व शेवटी नोव्हेंबर 2025 म्हणजे तब्बल 11 महीन्यांचे अंतर कसे हाही संशोधनाचा विषय आहे.

संबधित ऑर्डरवर एकुण चार नावे आहेत. त्यापैकी काही नावांच्या महिला उमेदवार संबधित ठिकाणी हजर झाल्या आहेत, असेही दिसत आहे. या प्रकरणात एका पक्षाचा युवक पदाधिकारी सहभागी असून त्याने संबधितांकडून नोकरी लावण्याच्या हमीवर लाखो रूपये उखळल्याची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे.

तर गुन्हा दाखल करू ः डॉ. विजयकुमार वाघ

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता याबाबत खात्री करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी याबाबत खात्रीशीर माहिती देऊ. संबधित ऑर्डर खोटी आहे, असे आढळले तर मी स्वतः त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *