padalkar news : काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटलांना न मिळण्यात विश्वजीत कदम, जयंत पाटलांचा वाटा : खासदार विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही, हे विश्वजीत कदम आणि जयंत पाटील यांना आधीच माहित होते. त्या दोघांनी मिळून ते जाणीवपूर्वक ठरवून केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केला आहे.
padalkar news : काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटलांना न मिळण्यात विश्वजीत कदम, जयंत पाटलांचा वाटा
आ. गोपीचंद पडळकर यांचा गौप्यस्फोट , वातावरण बदलताच नेत्यांनी भूमिका बदलली
विशाल पाटील यांच्याबाबतचे बदलते वातावरण लक्षात घेवून त्यांनी दोन्ही नेत्यांची भूमिका बदलली होती, ही वस्तुस्थिती आहे. विशाल पाटलांच्या उमेदवारीवरून पडळकरांचा खळबळजनक आरोप केल्याने सांगलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सांगली येथे काही कार्यक्रमांसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पडळकर म्हणाले, विश्वजीत कदमांना स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हा सर्व इव्हेंट करायचा होता. मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी कसा खंबीरपणे उभा राहतो, हे त्यांना दाखवायचे होते. पण प्रत्यक्षात तिकीट दुसर्याला विकले गेले आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, याबाबतची दक्षता विश्वजीत कदम यांच्यासह जयंत पाटील यांनी रणनिती आखली होती.
विशाल पाटील अपक्ष उभे राहतील, हे कळल्यानंतर या नेत्यांची हवा गेली. विशाल पाटील यांच्याबाबतचे बदलते वातावरण लक्षात घेवून त्यांनी दोन्ही नेत्यांची भूमिका बदलली होती, ही वस्तुस्थिती आहे. नाईलाजास्तव त्यांना विशाल पाटलांसोबत राहावे लागले, असा दावाही त्यांनी केला.
बाजार समिती आणि जिल्हा बँकेत भ्रष्टाचार
राजकीय आरोपांसोबतच पडळकरांनी आर्थिक व्यवहारांवरूनही जयंत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना धारेवर धरले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. हे नेते त्याचे वाटेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जतच्या लोकांनी आता वेगळ्या बाजार समितीची मागणी केली आहे. तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींनी जतच्या स्वतंत्र बाजार समिती करण्याबाबतचे ठराव दिले आहेत.
जिल्हा बँकेच्या कारभारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बँकेत 10 हजार कोटींच्या ठेवी असताना केवळ 200 कोटींचा नफा कसा काय होतो? 100 रुपयांचा फायदा सांगायचा आणि 1000 रुपये खिशात घालायचे, हा कोणता प्रकार आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, जिल्हा बँकेने कर्नाटकच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला आहे.
भीतीपोटी आलेली एकत्र युती
जिल्ह्यातील सध्याची राजकीय युती ही कोणत्याही विचारधारेवर आधारित नाही. केवळ राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी युती झालेली आहे, असे पडळकर म्हणाले. आपण आता संपतो की काय, या भीतीपोटी हे लोक एकत्र आले आहेत, असे म्हणत त्यांनी या युतीवर टीका केली. तसेच, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरूनही त्यांनी मराठा समाजातील गरीब सदस्यांना संधी का दिली नाही, असा सवाल उपस्थित करीत नेत्यांच्या धोरणांवर टीका केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










