nandre news :नांद्रेत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने केले लंपास

SHARE:

nandre news :नांद्रेत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने केले लंपास : मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करुन गाढ झोपेत असणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हातोहात चोरट्याने लांबविले. सदर चोरीची घटना हि शनिवार दि. 23 मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

nandre news :नांद्रेत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने केले लंपास

याप्रकरणी असमा राजू मुजावर (वय 29, रा. इनामपट्टी वजनकाट्यासमोर, वसगडे रस्ता, नांद्रे) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी असमा मुजावर या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये राहतात. शनिवारी रात्री जेवण करून मुजावर या पतीसह घरात झोपल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी साधारणत: मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश केला.

फिर्यादी असमा यांच्या गळ्यातील 17 हजार 650 रुपयांचे सोन्याचे गंठन अलगद काढून घेवून त्याने पलायन केले. काही वेळाने ही बाब लक्षात आली. यानंतर मुजावर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *